प्रकृती खालावली उपोषणकर्त्यांची सोलापूरच्या रुग्णालयात पाठवले, आंदोलन सुरूच राहणार - Pantnagari Times

Breaking News

Friday, September 2, 2022

प्रकृती खालावली उपोषणकर्त्यांची सोलापूरच्या रुग्णालयात पाठवले, आंदोलन सुरूच राहणार


 

मंगळवेढा /  प्रतिनिधी


     मंगळवेढा उपविभागीय  कार्यालय मंगळवेढा येथे प्रहार संघटनेचे उपोषण सुरू होते गेली 21 दिवस झाले या उपोषणाकडे मंगळवेढा प्रांताधिकारी पाठ फिरवली होती परंतु उपोषण करते सिदराया माळी यांची तब्येत पूर्ण खलवली असल्यामुळे त्यांना शासकीय रुग्णालय सोलापूर येथे नेण्यात आले यावेळी तब्येत खलवल्यानंतर मंगळवेढा उपविभागीय अधिकारी जागे झाले आहेत  यावेळी मंगळवेढा तहसीलदार, मंगळवेढा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा येथील डॉक्टर लगेच हजर झाले व त्यांना शासकीय रुग्णवाहिकेमध्ये घेऊन सोलापूर येथे नेण्यात आले परंतु तेथील शेतकऱ्यांनी यानंतर आपले हे आंदोलन सुरूच राहील असे ठरविले यावेळी प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष समाधान हेंबाडे यांच्या नेतृत्वाखाली हे धरणे आंदोलन सुरू राहील असे सांगितले यावेळी शेतकरी अरुण आवताडे, गुरु शिंदे, नवनाथ शिंदे, निलेश कांबळे, पोपट पाटील, जगन्नाथ गायकवाड, प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा सरचिटणीस श्रीपाद पाटील, प्रहार चे मंगळवेढा तालुका अध्यक्ष समाधान हेंबाडे, तालुका उपाध्यक्ष राकेश पाटील, रोहिदास कांबळे, युवराज टेकाळे, अनिल धोडमिसे उपस्थित होते काझी बाधित शेतकऱ्यांना मोबदला त्वरित दिला पाहिजे व जुनोनी येथील लक्ष्मीबाई बोधगिरे यांचे घर पाडले आहे त्यांना तात्काळ मोबदला दिला पाहिजे व  जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवणार आहे अशी ठाम भूमिका समाधान हेंबाडे यांनी सांगितले आहे

Pages