सागर चाबुकस्वार यांची युवक काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र विभाग सोशल मीडिया समन्वयक पदी निवड - Pantnagari Times

Breaking News

Saturday, August 27, 2022

सागर चाबुकस्वार यांची युवक काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र विभाग सोशल मीडिया समन्वयक पदी निवड


 

मंगळवेढा/प्रतिनिधी

सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर होटगी येथील सामाजिक चळवळीचे कार्यकर्ते सागर चाबुकस्वार यांच्या कामाची दखल घेत युवक काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र विभाग सोशल मीडिया समन्वयक पदी निवड करण्यात आली या निवडीचे पत्र युवक काँग्रेसचे सोशल मीडिया महाराष्ट्र प्रभारी अनिकेत म्हात्रे यांच्या हस्ते देण्यात आले. 

सामाजिक कार्यकर्ते सागर चाबुकस्वार हे नेहमी सामाजिक लढ्यात अग्रेसर असतात महाराष्ट्र राज्यातील जनतेच्या समस्या शासन व प्रशासन दरबारी मांडून लोकांना न्याय देण्याचे काम त्यांनी आतापर्यंत केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत युवक काँग्रेसचे सोशल मीडिया महाराष्ट्र प्रभारी अनिकेत म्हात्रे यांनी सागर चाबुकस्वार यांची निवड करण्यात आली आहे त्यांच्या निवडीची वार्ता समजतातच अनेक सामाजिक व राजकीय क्षेत्रातील स्तरावरून सागर चाबुकस्वार यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे. 

सागर चाबुकस्वार यांची काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र विभाग सोशल मीडिया समन्वयक पदी निवड झाल्याने त्यांना युवक काँग्रेसचे राष्ट्रीय प्रभारी कृष्णा अल्लावरू, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी व्ही,महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले,काँग्रेस विधिमंडळाचे नेते बाळासाहेब थोरात, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, यांनी शुभेच्छा दिल्या


यावेळी सागर चाबुकस्वार यांनी सांगितले की युवक काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागामार्फत नवनवीन संकल्पना राबवून काँग्रेस पक्षाला बळकटी देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे माहिती दिली.

Pages