मंगळवेढा / प्रतिनिधी
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे या निवडणुकीसाठी अभिजीत पाटील यांनी गावाप्रमाणे दौरे आयोजित केले आहेत दरम्यान आज माळी महासंघाच्या कार्यकर्त्यांनी विठ्ठल कारखाना निवडणूक संदर्भात बैठक आयोजित केली होती या बैठकीमध्ये अभिजीत दादा पाटील यांना पाठिंबा देण्याचा निर्णय झाला असून निवडणुकीमध्ये अभिजीत पाटील यांनी माळी समाजाच्या दोघांना उमेदवारी द्यावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे.
बाळासाहेब माळी यांनी विठ्ठल कारखान्याबाबत सद्य परिस्थितीचे नेमके वर्णन यावेळी उपस्थितांना सांगितले .माळी समाजाच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांनी विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात आज बैठक आयोजित केली होती या बैठकीला अनेक शेतकरी बांधव विठ्ठल कारखान्याचे सभासद उपस्थित होते दोन वर्षे विठ्ठल कारखाना बंद राहिल्यामुळे ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांना त्रास झाला शेतकऱ्यांची बिले थकीत राहिले आहेत कामगारांचा पगार थकीत राहिला आहे याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली शेवटी होत असलेल्या निवडणुकीमध्ये अभिजीत पाटील यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला त्याच वेळी या निवडणुकीत अभिजीत पाटील यांनी माळी समाजाला दोन जागा द्याव्यात अशी मागणी देखील केली