मंगळवेढा / प्रतिनिधी
हुन्नूर तालुका मंगळवेढा येथे आज ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत सरपंच मनीषा मच्छिंद्र मच्छिंद्र खताळ यांच्या अध्यक्षतेखाली कार्यालयामध्ये विशेष सभा घेण्यात आली होती
यावेळी मंगळवेढा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यजित आवटे यांनी बालविवाह चे दुष्परिणाम सांगून बालविवाह रोखण्यासाठी जनजागृती होणे गरजेचे असल्याचे सांगून याबाबत उपाययोजना सांगण्यात आल्या हुन्नूर येथील ग्रामपंचायतची आज 31 मे रोजी सकाळी अकरा वाजता विशेष सभा आयोजित करण्यात आली होती या सभेमध्ये बालविवाह प्रतिबंध कायदा 2006 चे अनुषंगाने ग्रामसेवक जमीर मुलाणी उपस्थित ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांना बालविवाह याबाबत मार्गदर्शन केले परिसरामध्ये बालविवाह होऊ नये यासाठी सर्वांनी सर्वतोपरी प्रयत्न करावेत व जनजागृती करावी अशी मागणी केली
यावेळी सरपंच मच्छिंद्र खताळ, पोलीस हवालदार दत्तात्रय येलपले, माजी उपसरपंच राजू पुजारी, ग्रामपंचायत सदस्य भगवान माने, शंकर पुजारी, तूशांत माने, विक्रम पुजारी,नारायण कोरे, विकास पुजारी,तुकाराम वाघमोडे, सागर खताळ,संजय हेगडे, सुरज पुजारी,नाना पुजारी, अंगणवाडी सेविका सीमा यमगर,महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.