मंगळवेढा / प्रतिनिधी
लोणार तालुका मंगळवेढा येथील संपाबाई श्रीमंत पडोळकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आज दिनांक ८ रोजी सांगली येथील रविकांत पाटील हॉस्पिटल येथे निधन झाले.
मृत्यू समयी त्या ७९ वर्षाच्या होत्या त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, जावई ,नातू, नातवंडे, असा मोठा परिवार आहे.
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे मंगळवेढा तालुकाध्यक्ष नामदेव गोरड यांच्या त्या मावशी होत.
त्यांच्या निधनाने पडोळकर, गोरड ,बुरुंगले, कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
संपाबाई पडोळकर यांचे निधनाने लोणार परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.