महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना सोलापूरच्या मंगळवेढा तालुकाध्यक्षपदी नामदेव गोरड यांची निवड - Pantnagari Times

Breaking News

Thursday, March 3, 2022

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना सोलापूरच्या मंगळवेढा तालुकाध्यक्षपदी नामदेव गोरड यांची निवड


 

मंगळवेढा / प्रतिनिधी


पडोळकरवाडी ता.मंगळवेढा येथील नामदेव सोमांण्णा गोरड यांची महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या सोलापूर मंगळवेढा तालुकाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली यावेळी राज्य उपाध्यक्ष वाय.एल.हिरेमनी जिल्हा अध्यक्ष सूर्यकांत गायकवाड, जिल्हाप्रमुख श्रीशैल देशमुख, जिल्हा सचिव संजय चव्हाण, जिल्हा कार्याध्यक्ष नितीन स्वामी, जिल्हा खजिनदार कृष्णा आदटराव, जिल्हा सरचिटणीस संजय चव्हाण, महिला जिल्हा उपाध्यकक्षा सविता काळे, सविता मिसाळ, आदी उपस्थित होते. यावेळी पुणे विभागीय अध्यक्ष वाय. एल.हिरेमनी यांच्या हस्ते तालुका अध्यक्ष नामदेव गोरड यांना निवडीचे पत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी तालुका उपाध्यक्ष सुभाष राठोड, व महिला तालुका उपाध्यक्षपदी श्रीमती कलावती कोळी, व श्रीमती जयश्री हात्ताळी, यांचीही निवड करण्यात आली. 

यावेळी नुतन तालुकाध्यक्ष नामदेव गोरड यांनी सत्काररास उत्तर देताना सांगितले की मंगळवेढा तालुक्यातील जिल्हा परिषद चतुर्थ श्रेणी कर्मचारी वर्गाच्या कुठल्याही अडी अडचणी समस्या शासन व प्रशासन दरबारी मांडून त्याचा पाठपुरवठा जिल्हा कार्यकारिणीकडे करणार असल्याचे सांगितले सदर निवडीवेळी विजय कुंभार ,कबीर सुतार, दत्ता ढेकळे, पंढरपूर तालुका अध्यक्ष आनंदा कोळी, अण्णा बनकर, ज्ञानेश्वर कांबळे, चंद्रकांत शिंदे भारत पाटील विद्याधर हडपद ,श्रेयस वातेकर, गजानन तापले, गैबीसाहेब मोरे ,संभाजी भोरकडे, औदुंबर घाडगे ,बदाप्पा कोळी, कुंडलिक होवाळ ,श्रीमती विद्या पाटील, श्रीमती होनमाने, श्रीमती रत्नपारखी, श्रीमती वाघमारे, व्ही व्ही पाटील, राजू वाडेकर, गजानन तापीले, आदी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Pages