सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस प्रशांत साळे यांचा सत्कार संपन्न - Pantnagari Times

Breaking News

Monday, January 31, 2022

सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस प्रशांत साळे यांचा सत्कार संपन्न

मंगळवेढा/प्रतिनिधी

सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील यांनी नुकतीच जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली यामध्ये हुन्नुर तालुका मंगळवेढा येथील श्री संत चोखोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन प्रशांत साळे यांची सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस पदी निवड करण्यात आली या निवडीबद्दल मंगळवेढा व परिसरातून समाधान व्यक्त होत आहे  भोसे येथील चर्मकार समाज बांधवा मार्फत खडतरे वस्ती येथे नूतन सरचिटणीस प्रशांत साळे यांचा सत्कार संपन्न झाला

 यावेळी भोसे येथील प्रगतशिल शेतकरी महादेव खडतरे व ऊपसरपंच बाळासो काकडे यांचे हस्ते नूतन सरीचरणीस प्रशांत साळे यांचा सत्कार करण्यात आला अध्यक्ष म्हणून डॉ सिताराम खडतरे उपस्थीत होते 

कॉंग्रेस पक्ष हा तळागाळातील जनते चा विकास डोळ्यासमोर ठेऊन कार्य करणारा पक्ष असुन सध्या भाजप सरकारने देशातील गोरगरीब जनता व शेतकरी यांची घोर निराशा केली आहे भावी काळात देशाला कॉंग्रेस

पक्षाशिवाय पर्याय नसुन गोरगरीब व शेतकरी राजाला पुन्हा चांगले दिवस आणण्यासाठी

सर्वानी काग्रेस पक्षाला बळकटी द्यावी आगामी काळात कांग्रेस पक्षाच्या माध्यमातुन गोरगरीब जनतेच्या कामासाठी लढणारी युवकांची फळी अध्यक्ष धवलसिह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वा खाली तयार करणार असले चे नुतन सरचिटणीस प्रशांत साळे यांनी यावेळी सांगितले

याप्रंसगी उपसरपंच बाळु काकडे माजी ग्राप सदस्य बंडू खडतरे अण्णासो खडतरे महेश खडतरे महाविर खडतरे कैलास - खडतरे बिरु खडतरे दत्ता खडतरे गणेश खडतरे संभाजी खडतरे दौलत खडतरे समाधान खडतरे विठ्ठल खडतरे कॉन्ट्याक्टर बंडू मोरे प्रविण खडतरे नंदू खडतरे महादेव कोपे नागेश निकम  आदी उपस्थित होते.

Pages