मुस्लिम सेवा संघ महाराष्ट्र संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी मुबारक शेख यांची निवड - Pantnagari Times

Breaking News

Sunday, January 30, 2022

मुस्लिम सेवा संघ महाराष्ट्र संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी मुबारक शेख यांची निवड


 

मंगळवेढा / प्रतिनिधी


तालुक्यातील सामजिक कार्यकर्ते परिश्रम ग्रामीण विकास’ संस्थेचे अध्यक्ष मुबारक हसन शेख यांची “मुस्लिम सेवा संघ महाराष्ट्र” या संघटनेच्या सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष फिरोज मासुलदार यांच्या सहमतीने, महाराष्ट्र अध्यक्ष शरीफ देशमुख यांच्या आदेशाने तसेच महाराष्ट्र उपाध्यक्ष हाजी अब्दुल भाई, विभागीय अध्यक्ष शहाजान अतार यांच्या सहकार्याने ही निवड करण्यात आली आहे. मुबारक शेख यांनी स्व य सेवी संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात शासनाच्या विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात अल्पसख्याकांसाठी बचत गट निर्मिती करून महिलांना रोजगार निर्मिती करणेसाठी शासनाच्या माध्यमातून कमी व्याज दराने कर्ज उपलब्ध करून दिल्याने अनेकांच्या हाताला काम मिळाले असंघटित क्षेत्रातील कामगार करिता कृषी श्रमिक योजना राबवून मंगळवेढा तालुक्यातील हजोरो कुटुंबांना लाभ मिळवून दिला . युवकांना रोजगार संधी मिळावी या उद्देशाने व्यवसाय प्रशिक्षण दिले . शेतकऱ्यांना पिकाच्या लागवडीसाठी योग्य तंत्रज्ञान आत्मसात करणे साठी गावोगावी जाणीव जागृती अभियान, पीक पाणी व्यवस्थापन कार्यक्रम, पाण्याचे ताळेबंद मांडून पाणी बचतीचा कानमंत्र दिला, सर्व घटकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होणे करीता लोक सहभाग मिळावा यासाठी त्यांनी सत्यत्याने काम करीत आहेत त्यांनी वीस वर्षे काँग्रेस पक्ष अल्पसंख्याक विभाग  अध्यक्ष, सरचिटणीस म्हणून काम करत असताना अनेक योजना राबविल्या आहेत. ज्येष्ठ नेते माजी मुखमंत्री मा. सुशीलकुमार शिंदे साहेबाचे विश्वासू निकटचे म्हणून परिचित आहेत

आपण सामाजिक क्षेत्रात केलेल्या विविध कामाचा आढावा घेऊन ही निवड करण्यात आली असल्याचे त्यांनी संगितले. या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

या संघटनेने आणि पदाधिकाऱ्यांनी माझ्यावर खूप मोठी जबाबदारी टाकली आहे, याची मला जाणीव असून त्या पद्धतीने समाजाला एक नवी दिशा देण्याचे काम मी येथून पुढे करेन असे आश्वासन मुस्लिम सेवा संघ महाराष्ट्र या संघटनेचे नूतन सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष मुबारक शेख यांनी यावेळी दिले.

पाणी व स्वच्छता विभागातील सर्वांच्या वतीने श्री आकुडे, परिश्रम परिवार तर्फे डॉ. रजाक शेख, सचिन लांडे, सुभाष साळुंखे, अक्रम शेख, रेखाताई साळुंखे, अशाताई मेटकरी,

हुलजंती ग्रामपंचायत सदस्य शांतीलाल भोरकडे, तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष रोहिदास भोरकडे, धर्मा भोरकडे आदींनी त्यांचा सत्कार करून अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या

Pages