मंगळवेढा पोलीस स्टेशन व मंगळवेढा नगरपरिषद यांचा अभिनव उपक्रम चोर दरोडेखोर होणार जागेवर जेरबंद - Pantnagari Times

Breaking News

Wednesday, January 26, 2022

मंगळवेढा पोलीस स्टेशन व मंगळवेढा नगरपरिषद यांचा अभिनव उपक्रम चोर दरोडेखोर होणार जागेवर जेरबंद


 

मंगळवेढा / प्रतिनिधी


मंगळवेढा शहरात होणार नागरी सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित

सोलापूर जिल्हाधिकारी व सोलापूर ग्रामीण पोलीस दल व जिल्हा परिषद व नगरपरिषद मंगळवेढा यांचा अभिनव तेज उपक्रम

मा.जिल्हा पोलीस अधीक्षक सौ. तेजस्वी सातपुते मॅडम  जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर जिल्हा परिषद CEO दिलीप स्वामी यांच्या प्रयत्नातून , मंगळवेढा नगर परिषद  व जिल्हा ग्रामीण पोलीस दल व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या सयुंक्त विद्यामाने ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त 26जानेवारी रोजी  मंगळवेढा गावांमधील नगर परिषद सदस्य सदस्या सर्व पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते नागरिक यांचेसाठी नागरी सुरक्षा यंत्रणेची मिटीग व टोल फ्री नंबर 18002703600 प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले. 


याप्रसंगी उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक रणजित माने, मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव, कर निरीक्षक विनायक साळुंखे, जेष्ठ पत्रकार दिगंबर भगरे, समाधान फुगारे, दावल इनामदार, आदित्य मुदगुल,सामाजिक कार्यकर्ते भीमराव मोरे आदीजन उपस्थित होते.


सदर कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात कोरोनाचे सर्व नियमांचे पालन करून  नागरिकाची उपस्थिती राहिले.


पोलीस स्टेशन हद्दीत संकट काळात आपत्तीग्रस्त नागरिकाने ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या टोलफ्री नंबर 18002703600 वर कॉल केल्यास संबंधित व्यक्तीचा आवाज गावातील सर्व नागरिकांना कॉल स्वरूपात तत्काळ ऐकवला जाणार असल्याने गुन्ह्यांना आळा घालणे शक्य होणार आहे. ग्राम सुरक्षा यंत्रणेचे समन्वयक श्री विक्रमसिंह घाटगे यांनी श्री. डी. के. गोर्डे संचालक ग्राम सुरक्षा यांचे मार्गदर्शनाखाली  नागरिकांना यंत्रणेचे प्रात्यक्षिक दाखवले, सर्व  नगरपरिषद सदस्य  नागरिकांनी यंत्रणेत पुढील ४८ तासांत सहभागी होण्याचे आश्वासन दिले. सदर कार्यक्रमास श्री आप्पासाहेब समिंदर उपविभागीय अधिकारी मंगळवेढा डी.वाय.एस पी राजश्री पाटील, स्वप्नील रावडे तहसीलदार, रणजित माने पोलीस निरीक्षक, मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव, अनिकेत भोसले ग्राम सुरक्षा यंत्रणा विक्रमसिंह घाटगे जिल्हा समन्वयक  सत्यशिल घाटगे   सर्व नगरपरिषद  अधिकारी व पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते.   कार्यक्रमाचे संयोजन व सूत्रसंचालन       *मा. रणजित माने पोलीस निरीक्षक    यांनी केले.  कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले यांनी मेहनत घेवून कार्यक्रमाचे नियोजन केले.

आदरणीय डीवायएसपी राजश्री पाटील मॅडम यांनी आजच्या दिवशी संपूर्ण शहरास कॉल देऊन यंत्रणेचे स्वागत व सुरुवात केली


गेल्या 9 वर्षांत पुणे,नाशिक,सातारा,व अहमदनगर उस्मानाबाद जिल्ह्यातील 4500 हून अधिक गावे  व ग्रामीण पोलीस स्टेशन ग्राम सुरक्षा यंत्रणेत सहभागी झाले आहेत. ग्रामस्थ आपापले मोबाईल नंबर नोंदवून यंत्रणा वापरत आहेत. संपूर्ण भारतासाठी वापरता येणारा टोल फ्री नंबर 18002703600 वर नोंदणी केलेल्या नागरिकाने आपत्ती काळात फोन केल्यास त्याचा आवाज परिसरातील हजारो नागरिकांना त्वरित मोबाईल वर ऐकू जातो. परिसरातील नागरिकांना घटनां घडत असतांनाच घटनेची माहिती मिळाल्याने तातडीने मदत करणे व नुकसान टाळणे शक्य होते.


 ग्राम सुरक्षा यंत्रणेची उद्दिष्ट


घटनाग्रस्त नागरिकांना परिसरातील नागरिकांची तातडीने मदत मिळणे.


गावातील कार्यक्रम / घटना विना विलंब नागरी स्थांना एकाच वेळी कळणे.


अफवांना आळा घालणे.


प्रशासनाला नागरिकांशी जलद संवाद साधता येणे.


पोलीस यंत्रणेस कायदा सुव्यस्था कायम राखणे कामी नागरिकांचे सहकार्य मिळणे.


 


ग्राम सुरक्षा यंत्रणेची वैशिष्ट्ये


संपूर्ण स्वयंचलित यंत्रणा


गावासाठी यंत्रणा सुरु करणे व सहभागी होण्यासाठी सोपी पद्धत


संपूर्ण भारतासाठी एकच टोलफ्री नंबर 1800 270 3600


यंत्रणेत सहभागी असलेला कोणताही नागरिक आपत्ती काळात संपूर्ण परिसराला सावध करू शकतो.


संदेश देणाऱ्या व्यक्तीच्या आवाजातच संदेश कॉल स्वरुपात परिसरातील नागरिकांना मिळतो.


दुर्घटनेचे स्वरूप, तीव्रता , ठिकाण कळल्याने गावकऱ्यांना विना विलंब व नियोजनबद्ध मदत करता येते.


नियमानुसार दिलेले संदेशच स्वयंचलित रित्या प्रसारित होतात


नियमाबाह्य दिलेले संदेश/ अपूर्ण संदेश रद्द होतात व प्रसारित होत नाहीत.


एका गावात चोरी करून चोर दुसऱ्या गावच्या दिशेने गेल्यास त्या गावालाही सावध करणे शक्य.


वाहन चोरीचा संदेश आजूबाजूच्या १० किमी परिसरातील सर्व दिशांच्या गावांना तत्काळ मिळतो.


घटनेच्या तीव्रतेनुसार कॉल रिसीव्ह होत नाही तोपर्यंत रिंग वाजते.


संदेश पुढील 1 तास पुन्हा पुन्हा ऐकण्याची सोय. कोणत्याही वेळी आपल्यासाठी संदेश तपासण्याची सोय.


चुकीचा संदेश किंवा मिसकॉल देणारे नंबर आपोआप Black List होतात.


गावाबाहेर दुसऱ्या गावात अपघातग्रस्त नागरिकाचा संदेश घटना घडलेल्या परिसरातही प्रसारित होतात.


सरकारी कार्यालये/ पोलीस स्टेशन आदींना आपापल्या कार्यक्षेत्रातील सर्व नागरिकांना किंवा विशिष्ट एक किंवा एकापेक्षा जास्त गावांना किंवा कर्मचाऱ्यांना सूचना / आदेश देता येणे शक्य.

Pages