मरवडे येथे छ. शिवरायांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक बंगळूर येथील घटनेचा निषेध ! - Pantnagari Times

Breaking News

Sunday, December 19, 2021

मरवडे येथे छ. शिवरायांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक बंगळूर येथील घटनेचा निषेध !


 

मंगळवेढा / प्रतिनिधी


 छ.शिवराया सारख्या 

महापुरुषांकडे संकुचित मनोवृत्तीने बघणार्या समाजकंटकांनी पुतळ्याची विटंबना करीत मराठी माणसाला डिवचण्याचा प्रयत्न केला असून अशा विकृतीला कर्नाटक सरकारने लगाम घालावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी संजय पवार यांनी केले .  


 बंगळूर येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ मरवडे येथे आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते .यावेळी बोलताना पवार यांनी भाषावाद, प्रांतवाद , जातीय आस्मिता हे स्वतंत्र विषय असून छ. शिवाजी राजांसारख्या महापुरुषांची विटंबना करुन कानडी समाजकंटकांनी केलेले कृत्य घृणास्पद असून अशा समाजकंटकांवर त्वरीत कारवाई करावी अशी मागणी केली .   

  बंगळूर येथे छ.शिवरायांच्या पुतळ्याची नुकतीच विटंबना झाली या पार्श्वभूमीवर मरवडे येथे छ. शिवरायांच्या  पुतळ्यास सोलापूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दिलीपराव चव्हाण व सोलापूर जिल्हा  राष्ट्रवादी काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी संजय पवार यांच्या हस्ते दुग्धाभिषेक करण्यात आला. यावेळी शिवरायांची आरती करुन ध्येयमंत्र व प्रेरणा मंत्राचे पठण करण्यात आले.

       बंगळूर येथील  घटनेचा मरवडे ग्रामस्थांच्या वतीने निषेध करण्यात आला. यावेळी छत्रपती परिवाराचे संस्थापक सुरेश पवार यांनी स्वराज्य संकल्पक छ.शहाजीराजांनी वसवलेल्या बंगळूर या राजधानीच्या शहरात त्यांचे सुपुत्र छ.शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना होणे ही दुर्दैवी घटना असून मराठी आस्मितेवरील हा हल्ला सहन केला जाणार नाही अशा शब्दांत निषेध केला . प्रहार संघटनेच्या युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा. संतोष पवार , भिमराज प्रतिष्ठानचे सुनिल शिंदे यांनी मराठी भाषिक जनतेवर होणारा अन्याय व मराठी आस्मितेचा मानबिंदू असलेल्या छ. शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला . 

       यावेळी माजी सरपंच अशोकभाऊ पवार , युवक नेते धन्यकुमार पाटील , ग्रामपंचायत सदस्य अशोक जाधव, अमीर मणेरी , विठ्ठल चौधरी, समाधान ऐवळे  यांचे सह तंटामुक्तीचे अध्यक्ष शिवाजी केंगार , पोलिस पाटील महेश पवार , मेजर कुंडलिक गणपाटील, दत्तात्रय मासाळ, माजी उपसरपंच विजय पवार, अमोल घुले , बालाजी पवार, दिलीप गायकवाड , तेजस शिवशरण, शशिकांत जाधव, मधुकर फटे, सोपान कोलते , शिवाजी पवार साहेब , सिद्धाश्वर रोंगे, विकास दुधाळ , दत्तात्रय घुले, संजय जाधव यांचेसह गावातील विविध संस्थांचे  प्रमुख पदाधिकारी व गावातील शेकडो शिवप्रेमी युवक कार्यकर्ते उपस्थित होते . यावेळी सर्व धार्मिक विधीचे संचलन निखील कुलकर्णी यांनी केले . सूत्रसंचलन महावीर कांबळे यांनी केले तर आभार दत्तात्रय जाधव यांनी मानले.

Pages