वीर जवानांमुळेच देश सुरक्षित- प्रा. लक्षमण ढोबळे आश्रमशाळा येड्राव येथे श्रद्धांजली सभा संपन्न - Pantnagari Times

Breaking News

Saturday, December 11, 2021

वीर जवानांमुळेच देश सुरक्षित- प्रा. लक्षमण ढोबळे आश्रमशाळा येड्राव येथे श्रद्धांजली सभा संपन्न


 

मंगळवेढा / प्रतिनिधी

 भारत मातेच्या रक्षणासाठी आपल्या सर्वस्वाचे बलिदान करणार वीर योद्ध्यांनी देशाची एकता आणि अखंडता अबाधित राखली आहे . अशा भारतीय सैन्य दलाचे सी.डी.एस.जनरल प्रमुख बिपिन रावत व अन्य १२ लष्करी अधिकाऱ्यांना तामीळनाडू येथील  दुर्देवी हॕलिकॕप्टर अपघातात वीरगती प्राप्त झाली, देशासाठी हा मोठा धक्का असून संपूर्ण देशवासी रावत व त्यांच्या कुटूंबियांच्या दुखाःत सहभागी आहेत अशा शब्दांत माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या .  


शाहू शिक्षण संस्था  संचलित आश्रमशाळा येड्राव येथे कून्नूर दुर्घटनेतील लष्करी अधिकाऱ्यांना श्रद्धांजली वाहताना ते बोलत होते . यावेळी प्रा. ढोबळे यांनी भारतीय सैन्य दलाचा दैदिप्यमान इतिहास मांडून देश सुरक्षित ठेवण्याचे अलौकिक कार्य भारमातेच्या जवानांमुळेच होते अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या .

          यावेळी मरवडे येथील छत्रपती परिवाराचे संस्थापक सुरेश पवार यांच्या हस्ते आमरज्योत प्रज्वलित करण्यात आली. यावेळी बोलताना पवार यांनी भारतीय लष्करांमुळेच आपण सुरक्षित असून भारतमातेच्या असंख्य जवानांनी प्राणाहुती देऊन त्याग व बलिदानाची गौरवशाली परंपरा निर्माण केल्याचे दाखले देऊन वीरगती प्राप्त लष्करी अधिकाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण केली .  

          यावेळी शाळेतील सहशिक्षक तानाजी पाटील, सिद्धेश्वर रोंगे यांनी आपल्या मनोगतातून सहवेदना व्यक्त केल्या . यावेळी प्राचार्य विश्वंभर काळे, मुख्याध्यापक प्रकाश माळी व्यासपीठावर उपस्थित होते .

              याप्रसंगी मरवडे पंचक्रोशीतील आजी माजी सैनिक सर्वस्वी औदुंबर माने, भारत पाटील, भारत शिंदे, भिमराव यलमार, गंगाधर काळे ,रघुनाथ मंगेडकर, मच्छिंद्र कोळेकर , शांताराम पाटील इ. मान्यवरांसह शिक्षक , पालक ,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते . सूत्रसंचलन गोरक्ष जाधव यांनी केले तर आभार भाऊसाहेब घुले यांनी मानले .

Pages