हत्तीज गावानजीक वाळू तस्करांकडून दहा लाख तीस हजारचा मुद्देमाल जप्त; वैराग पोलिसांची कामगिरी - Pantnagari Times

Breaking News

Friday, December 3, 2021

हत्तीज गावानजीक वाळू तस्करांकडून दहा लाख तीस हजारचा मुद्देमाल जप्त; वैराग पोलिसांची कामगिरी


वैराग / मुजम्मिल कौठाळकर

हत्तीच गावानजीक वैराग पोलिसांनी वाळूतस्कर कडून 10 लाख 30 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.
 ही कारवाई एक डिसेंबर रोजी मध्यरात्री सव्वा एकच्या सुमारास केली आहे. वैराग पोलिसात एकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैराग पोलीस नाईटराउंड पेट्रोलिंग करत असताना हातीज गावाजवळ एक हायवा वाळू भरून जात असताना पोलिसांना दिसला. एम एच 13 सी यु 4522 या क्रमांकाचे वाहन थांबवून पोलिसांनी वाहनांची तपासणी केली, असता विनापरवाना वाळू वाहतूक करताना आढळून आला. कुलदिप वाल्मीक सुरवसे रा. दत्तनगर वैराग ता. बार्शी त्याच्यावर गुन्हा दाखल करून 1) 10,00,000/- रु. कि. चा एक राखाडी रंगाचा हायवा टिप्पर त्याचा नंबर एम एच 13 सी यु 4522 जु.वा. कि. 2) 24000/- चार ब्रास वाऴु कि अं एकुण 10,24,000/- रु येणेप्रमाणे यात नमूद वर्णनाचा व किंमतीचा मुद्देमाल (वाहन) ताब्यात घेवून पोलीस ठाणेस आणून लावले आहे. त्यांच्यावर भा.द.वि. कलम 379, पर्यावरण संरक्षण अधिनियम 9 व 15 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई वैराग पोलिसांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय बहिर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल नागनाथ चवरे, पोलीस नाईक मुंडे यांच्या पथकाने केली आहे.

Pages