वैराग / मुजम्मिल कौठाळकर
वैराग मध्ये प्रामुख्याने भाजपा कडून माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष निंबाळकर यांचे सुपुत्र शाहूराजे निंबाळकर, जिल्हा परिषदेच्या आरोग्य व शिक्षण समितीचे माजी सभापती मकरंद निंबाळकर यांचे बंधू राजेंद्र निंबाळकर ,बार्शी तालुका व्यापारी मर्चंट असोसिएशनचे उपाध्यक्ष दिलीप गांधी , माजी ग्रामपंचायत सदस्य तथा अण्णा ग्रुपचे प्रमुख वैजिनाथ आदमाने यांच्या पत्नी राणी आदमाने ,आरपीआयचे वैराग शहराध्यक्ष दत्ता क्षिरसागर, राष्ट्रवादी काँग्रेस कडून माजी सदस्य तालुका पंचायत तथा गेला विधानसभेचे उमेदवार निरंजन भूमकर, त्यांचे बंधू तथा माजी उपसरपंच संजय भूमकर , विद्यमान पंचायत समिती सदस्य रंजना भालशंकर , माजी सरपंच सुजता डोळसे ,प्राचार्य खंडेराया घोडके, अंगणवाडी सेविका सुलभा मगर , माध्यमिक शिक्षिका सौ उषा आनंदकुमार डुरे , राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष समाधान पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा देऊन शिवसेनेकडून उमेदवारी दाखल केली आहे तर शिवसेनेकडून शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष देवा दिंडोरी माजी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायतचे विरोधी पक्षनेते अरुण सावंत, मी वैराकर अभियानाचे प्रणेते किशोर देशमुख , मौलाना आझाद विचार मंचचे जिल्हाध्यक्ष इस्माईल पटेल यांचे पुतणे इलियास पटेल,आबासाहेब देवकर , रवी पांढरमिसे ,संतनाथ केसरी मैदानाचे अध्यक्ष नंदकुमार पांढरमिसे स्वतः व पत्नी शुभांगी पांढरमिसे , रासपचे वंचित बहुजन आघाडीचे
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ओबीसी राजकीय आरक्षण रद्द झाल्यामुळे वैराग नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ३, ९ , १० व १५ या चार प्रभागातील निवडणूक स्थगित करण्यात आली असल्यामुळे या प्रभागातून निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांचा हिरमूड झाला आहे . वैराग नगरपंचायत च्या एकूण १७ प्रभागांपैकी येत्या २१ तारखेला तेरा प्रभागातील १३ जागेसाठीच निवडणूक होणार आहे .