लेखक दिग्दर्शक अल्ताफ शेख यांच्या धारावी कट्टा हिंदी चित्रपटाचा मुहुर्त संपन्न - Pantnagari Times

Breaking News

Saturday, November 20, 2021

लेखक दिग्दर्शक अल्ताफ शेख यांच्या धारावी कट्टा हिंदी चित्रपटाचा मुहुर्त संपन्न


 

पुणे / प्रतिनिधी 

लेखक दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख यांच्या धारावी कट्टा या हिंदी चित्रपटाचा मुहुर्त पुण्यात नुकताच संपन्न झाला. अल्ताफ शेख यांच्या 2018 मध्ये रिलीज झालेल्या वेडा बी एफ या चित्रपटाने चित्रपटगृहात चांगलाच गल्ला केला होता. या चित्रपटाला  राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित केले आहे. या चित्रपटानंतर बेतुका हा हिंदी चित्रपट, कम ऑन विष्णू हा कन्नड चित्रपट आणि आता धारावी कट्टा या चौथ्या हिंदी चित्रपटाच्या चित्रीकरणाचा शुभारंभ करण्यात आला आहे.

       


 दिग्दर्शक अल्ताफ शेख यांच्या लेखणी वैविध्यपूर्ण आहे. त्यांनी लिहिलेल्या मराठीतल्या पहिल्या कव्वालीची 'वर्ल्ड बुक रेकॉर्ड'मध्ये नोंद झाली आहे. आता धारावी कट्टा या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून, याचे डिजिटल राईट्स प्राईम पिक्चर फाईव्ह या ओटिटी प्लॅटफॉर्मने घेतले आहेत. धारावी कट्टाचे लेखक आणि दिग्दर्शक स्वतः अल्ताफ शेख आहेत. या सिनेमाची कथा एका वस्तीमधील चार मुले आपली काहीही चूक नसताना गुन्हेगार म्हणून दोषी ठरवले जातात. या मुलांना गुन्ह्यात अडकवले गेले आहे, हे एका कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याच्या लक्षात येते आणि तो पोलिस अधिकारी या मुलांची यातून सुटका करतो, अशी या चित्रपटाची कथा आहे.  

        या चित्रपटाच्या मुहूर्ताच्या वेळी ज्येष्ठ अभिनेते विजय नवले, ज्येष्ठ अभिनेत्री वृंदा बाळ, अभिनेत्री संगीता चवरे, अभिनेता अभिषेक चवरे, सहायक दिग्दर्शक हर्ष राजे, अभिनेत्री आरती पाटील, अभिनेता कुतुबुद्दीन गड्डेकर, अभिनेता नागेश स्वामी, अभिनेता आशिक राजपूत, नृत्य दिग्दर्शक शाहिद राजपूत, कास्टिंग दिग्दर्शक भैरव पवार, अभिनेत्री प्राजक्ता ठिगळे, अभिनेत्री शोभा देशपांडे, अभिनेत्री मुस्कान शेख, अभिनेता सलमान शेख, अभिनेता सतीश कुंभार आदी उपस्थित होते.

         धारावी कट्टा या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी मुंबई क्रिएशन एंटरटेनमेंट प्राईम पिक्चर 5 यांच्याकडे आहे.

Pages