शिक्षकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी शिक्षक समिती दक्ष शिक्षणाधिकारी संजय राठोड मंगळवेढा येथे शिक्षक समितीचा मेळावा संपन्न - Pantnagari Times

Breaking News

Saturday, November 20, 2021

शिक्षकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी शिक्षक समिती दक्ष शिक्षणाधिकारी संजय राठोड मंगळवेढा येथे शिक्षक समितीचा मेळावा संपन्न


 मंगळवेढा / प्रतिनिधी


सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न सोडवून घेण्यासाठी जिल्हाध्यक्ष अनिल कादे यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा करुन अनेक महत्वाच्या प्रश्नांची सोडवणूक करवून घेतली. शिक्षक समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते जिल्ह्यातील शिक्षकांच्या प्रश्नाला न्याय मिळवून देण्यासाठी दक्ष राहून कार्य करतात असे गौरवोदगार सांगलीचे शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांनी काढले .

                महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने आयोजित भव्य शिक्षक मेळाव्यात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. राठोड यांचा बदली निमित्त निरोपाचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी शिक्षकांचे प्रश्न सक्षमपणे व सलोख्याने सोडवून घेण्याची पद्धती वादातीत असल्याचे गौरवोदगार त्यांनी काढले .   या मेळाव्याच्या अध्यक्षतेखाली  महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे होते. 

          



यावेळी बोलताना सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी  झिरो पेंडन्सी धोरणाचा अवलंब करून लवकरच केंद्रप्रमुख,विस्तार अधिकारी पदोन्नती, समाजशास्त्र नकार मंजूर करणे,विज्ञान विषयशिक्षक नेमणूक आणि निवडश्रेणी हे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावणार असल्याची ग्वाही सोलापूर जिल्हा परिषदेचे नूतन शिक्षणाधिकारी डाॕ. किरण लोहार यांनी दिली .

      यावेळी शिक्षक समितीची नूतन महिला आघाडी घोषित करण्यात आली असून जिल्हाध्यक्षपदी ज्योती कलुबर्मे यांची तर जिल्हा सरचिटणीस पदी दिपाली बोराळे यांची निवड करण्यात आली.  महिला आघाडीच्या २१ महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान महिला आघाडीच्या राज्याध्यक्षा वर्षा केनवडे यांच्या हस्ते करण्यात आला. त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात आलेल्या  स्वच्छ-सुंदर शाळा तसेच  निबंध स्पर्धेतील पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, माळशिरस या चार तालुक्यातील विजेत्या शाळा व शिक्षकांचा गौरव  शाल,बुके,सन्मानचिन्ह,मानपत्र , पुस्तक भेट देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.यावेळी गौरवमूर्तीच्या वतीने प्रशांत सरुडकर, सुहास उरवणे यांनी मनोगत व्यक्त केले .

           



शिक्षक समितीचे राज्यनेते सुरेश पवार यांनी प्राथमिक शिक्षकांचे वेतन CMP प्रणालीद्वारे जिल्हास्तरावरुन थेट शिक्षकांच्या खात्यावर वर्ग करण्यात यावे,निवडश्रेणी आणि प्रलंबित मेडिकल बिले आणि इतर विषय मार्गी लावावेत अन्यथा आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याचे अधोरेखित करताना शिक्षक समितीच्या माध्यमातून मागील दोन वर्षात जिल्हा शाखेने केलेल्या कामकाजाचा आढावा सादर करत भविष्यकाळासाठी दिशा विषद केली .महिला राज्याध्यक्षा वर्षाताई केनवडे यांनी महिला आघाडीची आवश्यकता स्पष्ट करत महिला आघाडीच्या कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या.

        या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर  शिक्षक समितीचे राज्य कार्याध्यक्ष राजेंद्र नवले,पुणे विभागीय अध्यक्ष दयानंद कवडे,जिल्हाध्यक्ष अनिल कादे,जिल्हासरचिटणीस अमोगसिद्ध कोळी,सांगली बँकेचे चेअरमन यु.टी. जाधव,व्हाईस चेअरमन राजाराम सावंत, गटशिक्षणाधिकारी पोपटराव लवटे ,पुणे विभागीय उपाध्यक्ष दत्तात्रय पोतदार,राज्य प्रतिनिधी शिवाजी हावळे,शिक्षक नेते विकास उकिरडे , भारत कुलकर्णी , राजन सावंत , प्रताप काळे , संतोष हुमनाबादकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी  उपस्थित होते .  

      या भव्य मेळाव्याचे प्रास्तविक जिल्हाध्यक्ष अनिल कादे यांनी केले. सूत्रसंचलन शरद रुपनवर , दिगंबर तोडकरी यांनी केले तर आभार विठ्ठल ताटे यांनी मानले. हा भव्य सोहळा यशस्वी करण्यासाठी मंगळवेढा शिक्षक समितीच्या पदाधिकारी , कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले .

Pages