प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने अंध अपंग बांधवांना साखर वाटप‌ - Pantnagari Times

Breaking News

Saturday, November 6, 2021

प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने अंध अपंग बांधवांना साखर वाटप‌


कोल्हापुर जिल्हा /प्रतिनिधी 

प्रहार संघटना कुरुंदवाड अध्यक्ष सुधाकर लक्ष्मण तावदारे व प्रमुख पाहुणे लक्ष्मी बेकरी चे मालक राजन यांच्या शुभहस्ते अंध ,अपंग कर्णबधिर, मूकबधिर, यांना दिवाळीनिमित्त साखर वाटप करण्यात आली,अंध अपंग बांधवांना उपजिवीकेचे कोणतेही मोठे साधन नसल्याने तसेच गेली दोन वर्ष कोरोनामुळे रोजगाराची व आर्थिक अडचणीला अपंग बांधवांना याचा सामना करावा लागला या यंदाच्या दिपावली गोड करण्यासाठी संघटना व लक्ष्मी बेकरीचे मालक यांच्या वतीने साखर वाटप करण्यात आली. 

यावेळी अरिफ आत्तार संजय पाटील अन्वर बारगीर शरद कोरे नामदेव गायकवाड व सर्व सभासद व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Pages