मंगळवेढा/प्रतिनिधी
मराठा सेवा संघ मंगळवेढा यांचेवतीने क्रांतिसूर्य महात्मा फुले स्मृतिदिनानिमित्त मंगळवेढा तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच महाविद्यालयीन स्तरावरील 12 शिक्षकांना क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी पुणे विभागाचे माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत बोलत होते. विचारपीठावर जि. प.उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती दिलीप चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे, जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन संजय चेळेकर, दामाजी कारखान्याचे संचालक सचिन शिवशरण, गुरुवर्य विलास आवताडे, जिजाऊ ब्रिगेड शहराध्यक्षा इंदुमती जाधव, मराठा सेवा संघ पंढरपूर विभागाचे उपाध्यक्ष रामचंद्र हेंबाडे, मंगळवेढा तालुकाध्यक्ष संदीप पवार, मराठा सेवा संघ पंढरपूर विभागाचे अध्यक्ष नितीन जाधव आदी उपस्थित होते.
आमदार सावंत म्हणाले, मराठा सेवा संघ एक मोठी आणि चांगली संघटना असून या संघटनेचे कार्य कौतुकास्पद आहे. मंगळवेढा तालुक्यातील शिक्षण क्षेत्रातील कार्य पाहून आदर्शवत अशा शिक्षकांची मराठा सेवा संघाने निवड करून त्यांना सन्मानित केले ही गौरवाची बाब आहे. शिक्षण क्षेत्र हे सर्व विभागाचे मूळ असून शिक्षण क्षेत्रासाठी चांगल्यातले चांगले दिवस कसे येतील यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात ऋतुजा दसवत व शीतल जावळे यांनी गायलेल्या जिजाऊ वंदनेने करण्यात आली. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष संदीप पवार यांनी केले. मानपत्राचे वाचन राकेश गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन गणेश यादव व मोहन लेंडवे यांनी केले. आभार रामचंद्र हेंबाडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मारुती गोवे, सुरेश धनवे, दिलीप (आप्पा) मुढे, दिलीप जाधव, मोहन लेंडवे, विकास मोरे, अनिल पाटील, राकेश गायकवाड, मोहन लेंडवे, तानाजी सूर्यवंशी, महादेव भोसले, अशोक चव्हाण, हरी माने तसेच सेवा संघाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
_--------------------------------
मराठा सेवा संघाच्या वतीने यांचा झाला सन्मान --
राजाराम डांगे ( जि प शाळा लोणार), गुंडोपंत घाडगे (जि प शाळा घाडगेवाडी, भोसे), अर्जुन आवताडे ( कै. नानासाहेब नागणे प्रशाला, मंगळवेढा), मारुती दवले ( न पा कन्या शाळा नंबर 1), शिवकुमार स्वामी (जवाहरलाल हायस्कूल, मंगळवेढा), पठाण शिवशरण (इंग्लिश स्कूल मंगळवेढा), गुरुदेव स्वामी (माध्यमिक आश्रम शाळा हुन्नूर), दत्ता सरगर ( दामाजी महाविद्यालय मंगळवेढा),संगीता कदम-ताड (इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज मंगळवेढा), संजयकुमार घोडके (स्वामी विवेकानंद विद्यालय गोणेवाडी), महादेव दसवत ( इंग्लिश स्कूल भोसे), दया मोरे-वाकडे ( माध्यमिक शाळा अरळी).