वैराग / मुजम्मिल कौठाळकर
आज रोजी वैराग येथील एसटी बस स्थानक येथील महामंडळाचे कर्मचारी संपाला भेट घेऊन त्यांना आण्णा ग्रुप व मौलाना आझाद विचार मंच यांच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आले.
लढाई आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, हम सब एक है, आशा आवेशपूर्ण घोषणात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. विविध संघटना , संस्थांच्या प्रतिनिधींनी व वैराग येथील आण्णा ग्रुप,मौलाना आझाद विचार मंच च्या वतीने संपकरी कर्मचाऱ्यांना भेट घेऊन त्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. विशेष म्हणजे या संपाला सर्व स्तरातून मिळत असलेल्या पाठिंब्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना पाठबळ मिळाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण झाले पाहिजे या प्रमुख मागणी व इतरही मागण्या मान्य करण्यात यावे ह्या मागण्या पाठिंब्याच्या पत्रात केल्या आहेत.
यावेळी वैजीनाथ (आण्णा) आदमाने , सामाजिक कार्यकर्ते अमरराजे निंबाळकर, मौलाना आझाद विचार मंचचे जिल्हाध्यक्ष इस्माईल पटेल , जगन्नाथ आदमाने (मेजर),रफिक बागवान,नाना शिखरे , आण्णा गाटे , राहुल पालकर ,नितीन पाणबुडे , लक्ष्मण बचुटे, रवि पासलकर , अनिल गाटे , किरण काळे, इल्यास पटेल ,सोहेल शेख, साहिल शेख, यासीन शेख, याकूब बागवान, बबलू बागवान,अमोल जगदाळे (आण्णा ग्रुप व मौलाना आझाद विचार मंचचे सर्व कार्यकर्ते ) उपस्थित होते.