वैराग नगरपंचायत निवडणूक निंबाळकराच्या अस्तित्वाची ,भुमकरांच्या प्रतिष्ठेची , सोपलाच्या संघर्षाची ठरणार - Pantnagari Times

Breaking News

Tuesday, November 30, 2021

वैराग नगरपंचायत निवडणूक निंबाळकराच्या अस्तित्वाची ,भुमकरांच्या प्रतिष्ठेची , सोपलाच्या संघर्षाची ठरणार


वैराग / मुजम्मिल कौठाळकर

  नव्याने स्थापन झालेल्या वैराग नगरपंचायती मध्ये पहिल्या नगराध्यक्षपदाचा मान नगरसेवकाचा मान आपल्याच पार्टिला मिळावा यासाठी पहिल्या नगरपंचायत आपल्याच ताब्यात यावी यासाठी सध्या नेतेमंडळी धावपळ सुरू आहे. ही निवडणूक अटीतटीची होणार असून इच्छुकांसाठी महत्त्वाची ठरणार आहे .तशी भूमकरांसाठी प्रतिष्ठानची , निंबाळरांसाठी अस्तित्वाची तर सोपल गटाची संघर्षाची असणार आहे .

 गटातटाच्या राजकारणामुळे वैरागच्या निवडणुका जिल्ह्यात गाजत होत्या, मात्र यंदा नव्या नगरपंचायतीची निवडणूक पक्षीय पातळीवर होण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यातील निवडणूक राज्यात गाजणार एवढे मात्र नक्की झाले आहे. शिवसेना मात्र सहकारी पक्षांना एकत्र येऊन आघाडी करणार असल्याचे संकेत दिले जात आहेत.. बार्शी तालुक्यातील आज पर्यंतच्या निवडणुका पक्षापेक्षा व्यक्तीसापेक्ष झाल्याच्या आपण पाहिल्या आहेत. वैराग हा तालुक्याचाच भाग असल्याने इथेही तिच परिस्थिती होती. आता नव्याने अस्तित्वात आलेल्या वैराग नगर पंचायतीची निवडणूक लागली आहे. यापूर्वी निंबाळकर आणि भुमकर या दोन गटांमध्येच वैरागच्या निवडणुका रंगल्या आहेत. मात्र पहिल्या नगरपंचायतीची पहिली निवडणूक पक्षीय पातळीवर होणार असल्याची चिन्हे सध्या होत असलेल्या हालचालीवरून दिसून येत आहेत.बार्शी तालुक्याचे आमदार राजेंद्र राऊत हे भाजप गोठ्यातील असल्याचे सर्वश्रुत आहे, त्यांनी वैराग नगरपंचायत लढवण्याचे संकेत दिले असून भाजपाचे कमळ फुलवण्यासाठी तयारीत राहण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. यावरून वैराग नगर पंचायतीची निवडणूक संतोष निंबाळकर गट कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचे जवळपास निश्चित झाले आहे तर निंबाळकर गटाला पारंपारिक विरोधक असलेले निरंजन भूमकर यांनी राष्ट्रवादी पक्षातून विधानसभा लढवल्या मुळे नगर पंचायतीची निवडणूक ही राष्ट्रवादी पक्षाच्या घड्याळ चिन्हा द्वारे लढवण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे निरंजन भूमकर यांचा गट राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हाच्या माध्यमातून रिंगणात उतरणार आहे.वैराग नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये माजी मंत्री दिलीप सोपल यांची धुरा सांभाळत असलेले अरुण सावंत हे शिवसेनेच्या धनुष्यबाणावर लढतात की आघाडी तयार करून लढतात हे अद्याप निश्चित झालेले नाही .भाजपाचे गृहनिर्माण सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे देखील सोबत राहणार असल्याने आघाडी द्वारेच लढण्याची शक्यता अधिक आहे.सध्या नगरपंचायतीच्या निवडणुकीमुळे वातावरण चांगलेच ढवळून निघाले असून ज्यांची मते अधिक आहेत अशांना आपल्याकडे खेचण्याची स्पर्धाच सुरू असल्याचे चित्र आहे. जो तो नेता सक्षम उमेदवाराच्या शोधात असून कस पणाला लावत आहेत मतदारांचा कौल आपल्या पदरात पडावा यासाठी वेगवान हालचाली सुरू केल्या आहेत.

मागील ग्रामपंचायत निवडणुकीवेळी माजी मंत्री दिलीप सोपल यांची धुरा माजी सभापती मकरंद निंबाळकर यांनी सांभाळली होती .त्यावेळी ग्रामपंचायत मध्ये चार सदस्य निवडून आणण्यात त्यांना यश मिळाले होते. मात्र या त्यानंतर स्वतः पार्टी प्रमुख असलेले मकरंद निंबाळकर सध्या संतोष निंबाळकर यांच्या सोबत आहेत त्यामुळे चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. एकंदरीत लढती अटीतटीची होणार आहे.

Pages