मंडप जळत होतं आणि लोक जेवणात मग्न होते....पाहा व्हिडीओ - Pantnagari Times

Breaking News

Monday, November 29, 2021

मंडप जळत होतं आणि लोक जेवणात मग्न होते....पाहा व्हिडीओ


 

मुंबई: सध्या सगळीकडेच लग्नाची धूम आहे. लग्नाच्या हंगामात असे काही लोक असतात ज्यांना लग्नाशी काही देणं घेण नसतं. पण त्यांना लग्नातील जेवणात खूप जास्त इंट्रेस्ट असतो.


अशा लोकांना आपल्या अवती-भवतीचं भानही नसतं. एका लग्नात मोठी दुर्घटना घडली. त्याचा व्गिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की लग्नासाठी आलेले लोक जे होते ते लग्नाऐवजी जेवणात जास्त मग्न होते. या लग्नादरम्यान मंडपाला आग लागली. त्यावेळी ती विझवण्यासाठी जेवत असलेल्यांपैकी एकहीजण उठला नाही. जणू काही त्यांना पडली नाही.


या व्हिडीओमध्ये दिसत आहे की मंडपाला भीषण आग लागली आहे. दुसरीकडे आलेले पाहुणे जेवणाचा आनंद घेत आहेत. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ भिवंडीतील असल्याचा दावा केला जात आहे. मात्र झी 24 तासने या व्हिडीओची कोणतीही पुष्टी केली नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मंडप जळत होतं आणि लोक जेवणात मग्न होते. असंच हा व्हिडीओ पाहून तरी परिस्थिती दिसत आहे.

Pages