वैराग नगरपंचायत निवडणुकीचे बिगूल वाजले - Pantnagari Times

Breaking News

Wednesday, November 24, 2021

वैराग नगरपंचायत निवडणुकीचे बिगूल वाजले


वैराग / मुजम्मिल कौठाळकर

  राज्यातील १०५ नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम बुधवारी (ता. २४) राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील नवनिर्मित झालेल्या वैराग नगरपंयातीची निवडणूक येत्या २१ डिसेंबरला होणार आहे. यात सतरा जागांसाठी निवडणूक होणार आहे. कोरोनानुळे वैराग नगरपंयातीची निवडणूक वर्षभर लांबली. मात्र, निवडणूक आयोगाकडून नगरपंचायतींच्या निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर झाला. त्यात वैराग नगरपंचायतीचा समावेश आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या २९ नोव्हेंबरला प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

३० नोव्हेंबरला जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहीर करतील. नामनिर्देशन पत्र वेबसाईडवर भरण्यासाठी १ डिसेंबर ते ७ डिसेबर रोजी सकाळी अकरा ते दुपारी दोन यावेळेत भरता येतील. वरील नामनिर्देशन पत्र स्विकारण्याचा कालावधी १ डिंसेबर ते ७ डिसेंबर सकाळी अकरा ते दुपारी तीन यावेळेत शनिवार व रविवार वगळता राहणार आहे. अर्जाची छाननी व वैध नावे अर्ज ८ डिसेंबरला सकाळी अकरा वाजता जाहीर होणार आहे. १३ डिसेंबरला अर्ज माघारीची मुदत आहे. निवडणूक चिन्ह देणे व अंतिम यादी प्रसिद्ध करणेसाठी उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या अंतिम दिवसाच्या दुसऱ्या दिवशी मुदत आहे. २१ डिसेंबरला सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच यावेळेत मतदान होणार आहे. २२ डिसेंबरला सकाळी १० वाजता मतदान मोजणीस सुरवात होईल. निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे

Pages