शिक्षक समितीची सोलापूर जिल्हा महिला आघाडी घोषित ज्योती कलुबर्मे, दिपाली बोराळे यांच्यासह २१ पदाधिकार्यांची निवड - Pantnagari Times

Breaking News

Monday, November 22, 2021

शिक्षक समितीची सोलापूर जिल्हा महिला आघाडी घोषित ज्योती कलुबर्मे, दिपाली बोराळे यांच्यासह २१ पदाधिकार्यांची निवड


 

मंगळवेढा / प्रतिनिधी 


मंगळवेढा येथे संपन्न झालेल्या भव्य शिक्षक  मेळाव्यात शिक्षक समितीच्या सोलापूर जिल्हा शाखेची  नूतन महिला कार्यकारिणी महिला आघाडीच्या  राज्याध्यक्षा वर्षा केनवडे यांनी घोषित केली . जिल्ह्यातील सर्व तालुका शाखांना प्रतिनिधित्व देत २१ महिलांना यामध्ये स्थान देण्यात आले असून जिल्हाध्यक्षपदी सौ.ज्योती कलुबर्मे यांची तर सरचिटणीसपदी श्रीमती  दिपाली बोराळे यांची निवड करण्यात आली आहे .    

शिक्षक समितीच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने जिल्ह्यातील शिक्षक भगिनींचा भव्य मेळावा मंगळवेढा येथे संपन्न झाला. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे हे होते .यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना माहिला आघाडीच्या राज्याध्यक्षा सौ. वर्षा केनवडे यांनी सक्षम , क्रियाशील महिला कार्यकर्त्यांच्या बळावर शिक्षक समितीची संघटनात्मक ताकद वाढीस लागली असून महिला भगिनींच्या प्रश्नांची सोडवणूक सुलभतेने होण्यासाठी महिला आघाडीचे संघटन चांगल्या पद्धत काम करेल असा विश्वास व्यक्त केला . तर नूतन जिल्हाध्यक्षा ज्योती कलुबर्मे यांनी सर्व जिल्हा व तालुका शाखांतील महिलांना सोबत घेऊन महिलांचे प्रश्न अग्रक्रमाने सोडविण्यासाठी कार्य करणार असल्याची ग्वाही दिली .

        जिल्ह्यातील सर्व तालुका शाखांना प्रतिनिधित्व देऊन राज्य कार्याध्यक्ष राजेंद्र नवले , दयानंद कवडे, जिल्हाध्यक्ष अनिल कादे , सरचिटणीस अमोगसिद्ध कोळी , सुरेश पवार यांनी सर्व पदाधिकार्यांशी विचारविनिमय करुन जाहीर केलेली कार्यकारिणी पुढीलप्रमाणे ........


जिल्हा नेत्या ..... सौ.अंबिका शिंदे 

 कार्याध्यक्ष -- सौ.सारिका गोडसे

 कोषाध्यक्ष-- श्रीमती जया  साठे 

प्रसिद्धी प्रमुख --

 श्रीमती पंचफुला गायकवाड 


संपर्कप्रमुख

श्रीमती अंजना सुरवसे,

जैतुन्निसा शेख 

उपाध्यक्ष --

 श्रीमती दिपाली धत्तुरगी,

श्रीमती सुनिता खंकाळ,  श्रीमती अलका चिकणे,

सौ.सुरेखा इंगळे

श्रीमती. वैशाली महाजन 

सल्लागार -- 

श्रीमती अनिता काटकर

 श्रीमती उमा कोळी 


सोशल मिडीया प्रमुख -- श्रीमती राजश्री पाटील 

प्रवक्त्या- श्रीमती शारदा जवळगे

सहचिटणीस -- श्रीमती करुणा खमितकर 

कार्यालयीन चिटणीस

सौ.चंद्रकला खंदारे 


संघटक

श्रीमती कल्पना शेलार ,

श्रीमती रेखा करंडे

           या सर्व नवनियुक्त महिला पदाधिकार्यांचा नियुक्ती पत्र , शाल , फेटा , बुके देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शिक्षक समितीच्या विविध तालुक्यातील महिला आघाडीच्या पदाधिकारी नयना पाटील , अमृता कुलकर्णी ,  देवकी दुधाणे, सुषमा सुतार , सुजाता देशमुख , सविता नाळे, जयश्री धावणे अर्चना कोळी ,अर्चना राऊत,यास्मिन शेख,हिराबाई क्षिरसागर, लक्ष्मी गोरे यांच्यासह प्रमुख महिला पदाधिकारी तसेच जिल्ह्यातून सुमारे पाचशेहून अधिक महिला सदस्यांची उपस्थिती होती. सूत्रसंचलन शिवकांता चिमदे यांनी केले तर आभार चेअरमन विद्याताई तोडकरी यांनी मानले .

Pages