शिक्षकांचे सर्व प्रलंबित प्रश्न निकालात काढू - शिक्षणाधिकारी डॉ.किरण लोहार मंगळवेढा येथे शिक्षक समितीचा विभागीय मेळावा संपन्न - Pantnagari Times

Breaking News

Saturday, November 20, 2021

शिक्षकांचे सर्व प्रलंबित प्रश्न निकालात काढू - शिक्षणाधिकारी डॉ.किरण लोहार मंगळवेढा येथे शिक्षक समितीचा विभागीय मेळावा संपन्न


 

मंगळवेढा / प्रतिनिधीसोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे सर्व प्रश्न निकालात काढणार असून चिंतामुक्त शिक्षकांच्या माध्यमातून जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्तेचा आलेख उंचावण्यासाठी धोरण आखून काम करण्याची ग्वाही सोलापूर जिल्हा परिषदेचे नूतन शिक्षणाधिकारी डाॕ.किरण लोहार यांनी दिली .             

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने पंढरपूर विभागाचा भव्य शिक्षक मेळावा मंगळवेढा येथे आयोजित करण्यात आला होता.याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते . या मेळाव्याच्या अध्यक्षतेखाली  महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे होते. यावेळी बोलताना सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी  झिरो पेंडन्सी धोरणाचा अवलंब करून लवकरच केंद्रप्रमुख,विस्तार अधिकारी पदोन्नती, समाजशास्त्र नकार मंजूर करणे,विज्ञान विषयशिक्षक नेमणूक आणि निवडश्रेणी आदी.प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावणार असल्याची ग्वाही शिक्षणाधिकारी डाॕ. किरण लोहार यांनी दिली .
      यावेळी शिक्षक समितीची नूतन महिला आघाडी घोषित करण्यात आली त्यामध्ये  जिल्हाध्यक्षपदी ज्योती कलुबर्मे यांची तर जिल्हासरचिटणीस पदी दिपाली बोराळे यांची निवड करण्यात आली असून महिला आघाडीच्या सर्व  २१ महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान महिला आघाडीच्या राज्याध्यक्षा वर्षा केनवडे यांच्या हस्ते करण्यात आला.

       त्याशिवाय  जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात आलेल्या  स्वच्छ-सुंदर शाळा तसेच  निबंध स्पर्धेतील पंढरपूर, मंगळवेढा, माळशिरस , सांगोला या तालुक्यातील विजेत्या शाळा व शिक्षकांचा गौरव शाल,बुके,सन्मानचिन्ह,मानपत्र व पुस्तक भेट देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.यावेळी गौरवमूर्तीच्या वतीने प्रशांत सरुडकर, सुहास उरवणे यांनी मनोगत व्यक्त केले .

     यावेळी जिल्ह्याचे माजी शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांचा बदलीच्या निमित्ताने सत्कार करण्यात आला. यावेळी 

निरोपाला उत्तर देताना  राठोड यांनी सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांनी पदरमोड करून जवळपास 6 कोटी रुपये लोकवर्गणीतून शाळांचा कायापालट करुत राज्यासाठी पथदर्शी असणारा स्वच्छ-सुंदर शाळा उपक्रम यशस्वी केला.याचे संपूर्ण श्रेय प्राथमिक शिक्षकांचेच असल्याचे पुनश्च एकदा अधोरेखित केले.कोरोनाच्या वैश्विक संकटात शिक्षकांनी अतिशय चांगल्याप्रकारे कामकाज करत गुणवत्तेच्या बाबतीत ही सोलापूर जिल्हा आग्रक्रमावर ठेवल्याचे गौरवोद्गार काढले. शिवाय  शिक्षक समितीचे पदाधिकारी शिक्षक समुदायाचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच अग्रेसर राहून कार्यरत असल्याने अनेक प्रश्नांची सोडवणूक झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली .

           शिक्षक समितीचे राज्यनेते सुरेश पवार यांनी प्राथमिक शिक्षकांचे वेतन CMP प्रणालीद्वारे जिल्हास्तरावरून थेट शिक्षकांच्या खात्यावर वर्ग करण्यात यावे,निवडश्रेणी आणि प्रलंबित मेडिकल बिले आणि इतर विषय मार्गी लावावेत अन्यथा आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याचे अधोरेखित केले . शिक्षक समितीच्या माध्यमातून मागील कालावधीत केलेल्या कामकाजाचा आढावा सादर करत भविष्यकाळातील संघटनेचे धोरण विषद केले  तर यामहिला राज्याध्यक्षा वर्षाताई केनवडे यांनी महिला आघाडीच्या कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या.

          या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर  शिक्षक समितीचे राज्य कार्याध्यक्ष राजेंद्र नवले,पुणे विभागीय अध्यक्ष दयानंद कवडे,जिल्हाध्यक्ष अनिल कादे,जिल्हासरचिटणीस अमोगसिद्ध कोळी,सांगली बँकेचे चेअरमन यु.टी. जाधव,व्हाईस चेअरमन राजाराम सावंत, गटशिक्षणाधिकारी पोपटराव लवटे ,पुणे विभागीय उपाध्यक्ष दत्तात्रय पोतदार,राज्य प्रतिनिधी शिवाजी हावळे,शिक्षक नेते विकास उकिरडे , भारत कुलकर्णी , राजन सावंत , प्रताप काळे , मानोहर कलुबर्मे, बाबू मठपती , गिरमल बिराजदार , संतोष हुमनाबादकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी  उपस्थित होते .  

      या भव्य मेळाव्याचे प्रास्तविक जिल्हाध्यक्ष अनिल कादे यांनी केले. सूत्रसंचलन शरद रुपनवर , दिगंबर तोडकरी यांनी केले तर आभार विठ्ठल ताटे यांनी मानले. सरचिटणीस अमित भोरकडे यांनी रेखाटलेल्या रांगोळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले . हा संपूर्ण सोहळा यशस्वी करण्यासाठी मंगळवेढा शिक्षक समितीच्या सर्व पदाधिकारी , कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले .

Pages