पुणे / प्रतिनिधी
आज रोजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट सामाजिक संघटनेच्या वतीने त्रिपुरा राज्यामध्ये मुस्लिम विरोधात अन्याय व अत्याचार झालेल्या घटने बद्दल मस्जिद जाळपोळ व मुस्लिम समाजावर घरात घुसुन अत्याचार करण्यात आले. या घटनेच्या विरोधात अंदोलन करण्यात आले.
आज आपल्या सुसज्ज, सुसंस्कृत भारत देशामध्ये सर्व धर्म समभाव व तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डाॅ. राजेंद्र प्रसाद व इतर महापुरुषांनी आपल्याला स्वतंत्रपणे कायदयानुसार जगण्याचे अधिकार दिले आहे.
सदरील घटनेतील समाज कंटकांना अटक करण्यात यावे. तसेच त्रिपुरा राज्यामध्ये अन्याय व अत्याचार त्वरित थांबवण्यात यावेत. असे महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट च्या वतीने निवेदनाद्वारे शासनाकडे मागणी केलेली आहे.
यावेळी नदीम भाई मुजावर संस्थापक अध्यक्ष, शाहबुद्दीन शेख प्रदेश कार्याध्यक्ष मुस्लिम फ्रंट , आसिफ जमादार मराठवाडा अध्यक्ष महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट, प्रमुख सल्लागार राजेंद्रसिंग वालिया, विनोद सोलंकी, कुंदन पूनावाला, पुणे जिल्हा अध्यक्ष हा जरा कबीर,आशा पाटुळे मॅडम कोअर कमिटी, कमरूनिसा शेख मुस्लिम फ्रंट, बाबा भाई शेख सोलापुर जिल्हा कार्याध्यक्ष, रफीक खान करमाळा तालुका अध्यक्ष मुस्लिम फ्रंट, अनवर बागवान बार्शी तालुका अध्यक्ष महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट, नवनियुक्त पुणे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शाकीर शाकीर भाई शेख, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष मुमताज इनामदार, कोर कमिटी सदस्य एडवोकेट मोसिन मनियार, इनामदार हाजी खाजा भाई पठाण, प्रवक्ते रफिक मुल्ला सर, खजिनदार इरफान शेख, आसलम शेख इंदापुर तालुका अध्यक्ष मुस्लिम फ्रंट, आदी उपस्थित होते.