त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त वैराग येथील मल्लिकार्जुन मंदिर लक्ष लक्ष दिव्यांनी उजळली - Pantnagari Times

Breaking News

Friday, November 19, 2021

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त वैराग येथील मल्लिकार्जुन मंदिर लक्ष लक्ष दिव्यांनी उजळली

वैराग/ मुजम्मिल कौठाळकर

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त वैराग येथील मल्लिकार्जुन मंदिर लक्ष लक्ष दिव्यांनी उजळली

  वैराग येथील श्री मल्लिकार्जुन मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त गुरुवारी संध्याकाळी दिव्याची रोषणाई करण्यात आली वैरागचे श्री मल्लिकार्जुन मंदिर प्राचीन असून या मंदिराचे बांधकाम पूर्णपणे दगडी व हेमांडपंथी असे आहे.मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करण्यासाठी दोन गर्भगृह रचना आहे. मंदिरातील गर्भगृहात भव्य मोठी महादेवाची उंची साळुसह पिंड आहे .मंदिराच्या रचनेत चौहोबाजूने उंच दगडी तटबंदी आहे. 
मंदिराच्या आवारात उंच दिपमाळ व डीकमली आहेत. मंदिराला ऐतिहासिक व धार्मिक वारसा आहेत प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त संध्याकाळी भाविक व पुजारी मंडळाच्या वतीने संपूर्ण मंदिर, शिखर व परिसरात शेकडो दिव्यांची रोषणाई करण्यात आली होती. ही रोषणाई पाहण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी होती

Pages