वैराग येथील शिवस्पर्श प्रतिष्ठान यांच्या वतीने एसटी कर्मचारी संपाला जाहीर पाठिंबा - Pantnagari Times

Breaking News

Thursday, November 18, 2021

वैराग येथील शिवस्पर्श प्रतिष्ठान यांच्या वतीने एसटी कर्मचारी संपाला जाहीर पाठिंबा


वैराग/ मुजम्मिल कौठाळकर

आज रोजी वैराग येथील एसटी महामंडळाचे कर्मचारी संपाला शिवस्पर्श प्रतिष्ठान यांच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आले.

 लढाई आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची,शासन विलीनीकरण झालं पाहिजे, कोण म्हणतंय देत नाही घेतल्याशिवाय राहणार नाही, हम सब एक है आशा आवेशपूर्ण घोषणात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे.
 शिवस्पर्श प्रतिष्ठाण यांनी संपकरी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे. सर्व स्तरातून मिळत असलेल्या पाठिंब्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना पाठबळ मिळाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे ,ज्या कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत त्यांच्या कुटुंबाला नुकसान भरपाई द्यावी, एसटी महामंडळ संपकरी कर्मचारी यांच्यावर होणारे अन्याय थांबवा ह्या मागण्या पाठिंब्याच्या पत्रात केल्या आहेत.

 यावेळी शिवस्पर्श प्रतिष्ठाण संस्थापक अजय दादा काळोखे, शिवजयंती अध्यक्ष गणेश मचाले ,स्वप्नील डोळसे, गोविंद ताटे ,संजय सातपुते शारुख बागवान ,संतोष राजगुरू, आशुतोष बंडेवर, आशिष गुंड, ऋषिकेश निंबाळकर ,बाळासाहेब दळवी, नागेश खेंदाळ ,पप्पू गुंजाळ आदी उपस्थित होते

Pages