मंगळवेढा येथे दि. १९ रोजी शिक्षक समितीचा महिला मेळावा - Pantnagari Times

Breaking News

Monday, November 15, 2021

मंगळवेढा येथे दि. १९ रोजी शिक्षक समितीचा महिला मेळावा


 

मंगळवेढा / प्रतिनिधी 


महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने दि. १९ नोव्हेंबर रोजी शिक्षक भगिनींचा मेळावा आयोजित करण्यात आला असून या मेळाव्यामध्ये शैक्षणिक प्रश्नांवर मंथन होणार असून जिल्हा पदाधिकार्यांची निवड व सत्कार आयोजित करण्यात आल्याची माहिती मंगळवेढा शाखेच्या अध्यक्षा ज्योती कलुबर्मे यांनी केले .

          मंगळवेढा येथील रजपूत लाॕन्स येथे शुक्रवार दि. १९ नोव्हेंबर रोजी दु. १ वाजता हा मेळावा संपन्न होणार असून यावेळी शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे , कार्याध्यक्ष राजेंद्र नवले , महिला आघाडीच्या राज्याध्यक्षा वर्षाताई केनवडे , पुणे विभागाचे अध्यक्ष दयानंद कवडे , शिक्षक नेते आनिल कादे, सुरेश पवार , अमोगसिद्ध कोळी यांच्यासह शिक्षक समितीचे मान्यवर जिल्हा पदाधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत .याशिवाय चार तालुक्यातील उपक्रमशील शाळा व शिक्षकांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते आयोजित करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले .

        


शिक्षक समिती ही शिक्षकांच्या प्रश्नांसाठी तत्पर राहून कार्यरत असणारी बलशाली मान्यताप्राप्त संघटना असून संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांच्या  जिव्हाळ्याच्या प्रश्नांची गेल्या ६० वर्षांपासून सोडवणूक केली जाते . महिलांना नेतृत्वाची संधी मिळावी व महिला शिक्षिकांच्या प्रश्नांची सोडवणूक जलद गतीने व्हावी यासाठी शिक्षक समितीने स्वतंत्र महिला आघाडी गठीत करण्याचा निर्णय घेतला असून प्रत्येक तालुका शाखेतून दोन महिलांना जिल्हा कार्यकारिणीमध्ये स्थान दिले जाणार आहे .

          या मेळाव्यासाठी जिल्ह्यातील सर्व महिला शिक्षक भगिनींनी सहभागी व्हावे आसे आवाहन तालुकाध्यक्षा सर्वश्री सुजाता देशमुख , देवकी कलढोणे ,अलका चिकणे ,सविता नाळे , पंचफुला गायकवाड ,जयश्री धावणे ,  रधिका राठोड यांच्या सह मंगळवेढा शाखेतील पदाधिकारी विद्या तोडकरी ,  अमृता कुलकर्णी , विजया पाटील, सुषमा सुतार , शिवकांता चिमदे , वंदना यादव, नौशाद शेख, कविता वाघमारे , राणुबाई शिंदे , स्वाती सरडे,रंजना वाघमारे ,प्रगती गायकवाड यांनी केले आहे .

Pages