वैराग नगरपंचायतींसाठी उद्या आरक्षणाची फेरसोडत - Pantnagari Times

Breaking News

Sunday, November 14, 2021

वैराग नगरपंचायतींसाठी उद्या आरक्षणाची फेरसोडत


वैराग/मुजम्मिल कौठाळकर

वैराग येथील नव्याने गरपंचायत ओबीसी आरक्षणाची सोडत ची प्रक्रिया पुन्हा नव्याने घेण्यात येणार आहे राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी यासाठी प्रक्रिया कालावधी निश्‍चित केला आहे संबंधित नगरपंचायतच्या मुख्यधिकारी स्तरावर सोमवार 15 नोव्हेंबर रोजी ओबीसी आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे.

  वैराग नगरपंचायतीमध्ये काढण्यात आलेल्या ओबीसी आरक्षण व त्यामधील महिला, सर्वसाधारण आरक्षणाची माहिती स्थानिक नागरिकांच्या माहितीसाठी व त्यावर हरकती मागविण्यासाठी नोटीस प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
 15 ते 18नोव्हेंबर या कालावधीत वैराग माळशिरस, नातेपुते येथील नगरपंचायतीसाठी काढण्यात आलेल्या ओबीसी आरक्षणाच्या सोडतीवर नागरिकांकडून हरकती व सूचना मागविण्यात येणार आहेत. या कालावधीत प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे 19 नोव्हेंबर रोजी सुनावणी प्रक्रिया घेणार आहेत
 प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडून अभिप्राय देऊन या हरकत ती 20 नोव्हेंबरपर्यंत विभागीय आयुक्त व नगरपंचायतीच्या प्रशासनाकडे पाठविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार विभागीय आयुक्त कार्यालयाकडून ओबीसी आरक्षणाबाबत 22 नोव्हेंबर रोजी अंतिम मान्यता देण्यात येणार आहे.
 23 नोव्हेंबर रोजी अधिनियम कलम दहा नुसार ओबीसी आरक्षणासंदर्भात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडून अंतिम सूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे .यावेळी प्रभाग निहाय एकुण लोकसंख्या व अनुसूचित जाती व जमातीची लोकसंख्या व आरक्षणाचा तपशीलही जिल्हाधिकारी शंभरकर यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात येणार आहे

Pages