सुधारित आदेशानुसार वैराग नगरपंचायतीचे फेर आरक्षण - Pantnagari Times

Breaking News

Monday, November 15, 2021

सुधारित आदेशानुसार वैराग नगरपंचायतीचे फेर आरक्षण


वैराग / मुजम्मिल कौठाळकर

राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार वैराग   नगरपंचायतीसाठी आरक्षण सोडत सोमवारी काढण्यात आली. यात १७ प्रभागांची आरक्षण सोडत काढण्यात आली .
          यात प्रभाग क्रमांक १ सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक २ सर्वसाधारण , प्रभाग क्रमांक ३ नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण ,प्रभाग क्रमांक ४ सर्वसाधारण महिला , प्रभाग क्रमांक ५ सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक ६ सर्वसाधारण महिला ,प्रभाग क्रमांक ७ सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक ८ सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक ९ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, प्रभाग १० नागरीकांचा इतर मागास प्रवर्ग महिला, प्रभाग क्रमांक ११ अनुसूचित जाती सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक १२ सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक १३ अनुसूचित जाती महिला, प्रभाग क्रमांक १४ सर्वसाधारण , प्रभाग १५ नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण, १६ सर्वसाधारण महिला व प्रभाग क्रमांक १७ सर्वसाधारण अशाप्रकारे १७ प्रभागांसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे .
      शुक्रवारी आरक्षण सोडतमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी २९.५ टक्के नुसार ५ जागांचे आरक्षण सोडत काढण्यात आली होती .आता नवीन आदेशानुसार नव्याने २७.५ टक्के नुसार नागरिकांचा मागास प्रवर्गाची १ जागा कमी होवून ४ जागा साठी आरक्षण काढण्यात आले. यातील २ जागा महिलांसाठी राखीव तर २ जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव असणार आहे .
      वैराग नगरपंचायतीमध्ये ११ वाजता अथर्व आनंद घोटकर , व जमजम इनुस सय्यद या चिमुकल्यांच्या हस्ते आरक्षणाची सोडत चिट्ठी व्दारे काढण्यात आली . 
      त्यावेळी उपविभागीय अधिकारी हेमंत निकम , नायब तहसिलदार संजीवन मुंडे, मुख्याधिकारी विणा पवार , राजकीय नेते व नागरीक उपस्थित होते

Pages