महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट सामाजिक संघटनेची वार्षिक आढावा बैठक व महाराष्ट्रातील विविध जिल्हा, तालुका, शहर नियुक्ती संपन्न - Pantnagari Times

Breaking News

Tuesday, November 2, 2021

महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट सामाजिक संघटनेची वार्षिक आढावा बैठक व महाराष्ट्रातील विविध जिल्हा, तालुका, शहर नियुक्ती संपन्न


    भुम/प्रतिनिधी

       पुणे येथे मा. नदीम भाई मुजावर संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक व विविध महाराष्ट्रातील निवड जिल्हा, तालुका, शहराची निवड करण्यात आली. 
      यामध्ये सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणारे समाजासाठी नेहमी धडपड करणारे समाजाचे सेवक यांच्या नियुक्ती करण्यात आली. याप्रसंगी खाजा तांबोळी विदर्भ अध्यक्ष मुस्लिम फ्रंट, कमरूनिसा शेख पिंपरी-चिंचवड शहर कार्याध्यक्ष, शाकीर भाई शेख पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष मुस्लिम फ्रंट, मुखिम शेख थेरगाव शहर उपाध्यक्ष मुस्लिम फ्रंट, राजु चाऊस भाई थेरगाव शहर कार्याध्यक्ष, रफीक बागवान खालापुर तालुका अध्यक्ष मुस्लिम फ्रंट, आमीर शेख खोपोली शहर अध्यक्ष मुस्लिम फ्रंट, मुमताज इनामदार पिंपरी-चिंचवड महीला शहर अध्यक्ष, अनिशा अल्लाबक्ष सय्यद इंदापुर महीला तालुका अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या व भविष्यात संघटनेच्या माध्यमातून समाजाची सेवा करावी व तसेच संघटनेच्या माध्यमातून गोरगरीबांना सहकार्य करुन समाजाचे विविध समस्याचे निवारण करावे व संघटन बळकट करावे असे संघटनेच्या वतीने त्याना सांगण्यात आले.
यावेळी नदीम भाई मुजावर संस्थापक अध्यक्ष, शाहबुद्दीन शेख प्रदेश कार्याध्यक्ष मुस्लिम फ्रंट , आसिफ जमादार मराठवाडा अध्यक्ष महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट, प्रमुख सल्लागार राजेंद्रसिंग वालिया, विनोद सोलंकी, कुंदन पूनावाला, पुणे जिल्हा अध्यक्ष हाजरा कबीर,आशा पाटुळे मॅडम कोअर कमिटी, , बाबा भाई शेख सोलापुर जिल्हा कार्याध्यक्ष, रफीक खान करमाळा तालुका अध्यक्ष मुस्लिम फ्रंट, अनवर बागवान बार्शी तालुका अध्यक्ष महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट, कोअर कमिटी सदस्य एडवोकेट मोसिन मनियार, इनामदार हाजी खाजा भाई पठाण, प्रवक्ते रफिक मुल्ला सर, खजिनदार इरफान शेख, आसलम शेख इंदापुर तालुका अध्यक्ष मुस्लिम फ्रंट, आदी उपस्थित होते.

Pages