वैराग नगरपंचायतसाठी 3 कोटी 20 लाखांचा निधी मंजूर:- निरंजन भूमकर - Pantnagari Times

Breaking News

Friday, November 5, 2021

वैराग नगरपंचायतसाठी 3 कोटी 20 लाखांचा निधी मंजूर:- निरंजन भूमकर


वैराग/ मुजम्मिल कौठाळकर

वैराग नगरपंचायतसाठी 3 कोटी 20 लाखांचा निधी मंजूर राष्ट्रवादी काँग्रेस नेते निरंजन भूमकर यांची माहिती

   महाराष्ट्र राज्य नगरविकास विभागाने दि.18/05/2021 रोजी वैराग नगरपंचायतीची स्थापना केली, वैराग नगरपंचायतिसाठी विकासात्मक उपाययोजना करणे कामी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य श्री. निरंजन भूमकर यांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय (मामा) भरणे साहेब यांचेकडे विकास निधीची मागणी केली होती त्याअनुषंगाने वैराग नगरपंचायतीस नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत कामासाठी विकास निधी मंजूर झाल्याची माहिती निरंजन भुमकर यांनी दिली केला आहे
1)वैराग शहरातील शहाजीराव पाटील सभागृह येथे अपारंपरिक ऊर्जा स्रोत सौरऊर्जा प्रकल्प उभा करणे - 25 लाख
2)संभाजी महाराज उद्यान येथे ओपन जिम विकसित करणे व उद्यान विकसित करणे- 10 लाख
3)मल्लिकार्जुन मंदिर परिसराजवळील उद्यान विकसित करणे व मल्लिकार्जुन विहिरीचे मजबुतीकरण करणे-15 लाख
4)लोकशाहीर अण्णाभाऊ साठे योजने अंतर्गत वैराग शहरातील अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण व गटार काँक्रीटीकरण करणे- 78.30 लाख
5)महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजने अंतर्गत गावठाण हद्दीमध्ये रस्ते काँक्रीटीकरण करणे-150 लाख
6)दलित वस्ती योजने अंतर्गत मातंग समाज मंदिर बांधणे-50 लाख
असे विविध कामासाठी वैराग नगरपंचायतीस एकूण 3 कोटी 20 लाख निधी मंजूर झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते निरंजन भुमकर यांनी दिली

Pages