प्रहरचा NTPC ला दणका.. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना कायम नोकरीसाठी बैठक संपन्न... - Pantnagari Times

Breaking News

Saturday, October 2, 2021

प्रहरचा NTPC ला दणका.. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना कायम नोकरीसाठी बैठक संपन्न...


 

सोलापूर / प्रतिनिधी

सोलापुरात जवळच असलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील आहेरवाडी या गावांमध्ये एनटीपीसी प्रकल्पामध्ये ज्यांची शेती किंवा जागा गेली आहे अशांना एनटीपीसी मध्ये कामावर सामावून घेण्याची  हमी एनटीपीसीने दिली होती परंतु असे असतानाही एनटीपीसीने स्थानिक कामगारांना आणि ज्यांच्या जागा केले आहेत त्यांना कामावर न घेता इतर राज्यातील कामगारांना कामावर घेतले होते त्यामुळे स्थानिक असलेल्या आणि शेतकऱ्यांच्या मुलांना मात्र एनटीपीसी कामावर न घेता त्यांना सरसगट प्रत्येकी पाच लाख रुपये देऊ केले होते यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाने आंदोलनाचा इशारा देत काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले होते त्या पार्श्वभूमीवर उपजिल्हाधिकारी तांबे साहेब यांच्या अधिपत्याखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे एनटीपीसी चे अधिकारी कविता गोयल, राहुल शर्मा आणि अंजली महाजन यांच्या उपस्थितीत तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर प्रमुख अजित कुलकर्णी संपर्कप्रमुख जमीर शेख कार्य अध्यक्ष  खालीद मणियार यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेण्यात आली...

या बैठकीत प्रामुख्याने तीन ते चार दिवसांमध्ये संपादित केलेल्या जमिनीच्या परिवारातील एका सदस्याला शासकीय नोकरीत सामावून घेण्यासाठी एनटीपीसी आपल्या मुख्य कार्यालय असलेल्या दिल्ली आणि मुंबईच्या कार्यालयाशी पत्रव्यवहार करून नोकरी देण्याचे आश्वासन दिले आहे. तशी हमी सोलापूरच्या एनटीपीसीच्या अधिकार्‍यांनी आजच्या झालेल्या बैठकीत दिली आहे


सदरच्या बैठकीमध्ये बैठक सुरू असताना NTPC च्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना सामान्य नागरिक म्हणून संबोधित केल्याने प्रहार चे अजित कुलकर्णी आणि जमीर शेख आक्रमक होत एनटीपीसीच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. आमच्या जमिनी घेऊन जर तुम्ही नोकरी देणार नसाल तर तुम्हाला एनटीपीसी नव्हे तर शहरात कुठेही फिरू देणार नाही आणि तुमची मुजोरगिरी प्रहार पूर्णपणे मोडून काढल्याशिवाय गप्प बसणार नाही असा इशारा या प्रसंगी दिला त्यामुळे या दरम्यान काही काळ गोंधळ सुद्धा झाला.


तसेच NTPC ने एकूण 4 दत्तक घेतलेल्या गावातील विधवा महिलांना देखील मासिक पेंशन देण्याचे लेखी करार केले असतानाही विधवांना पेन्शन दिली जात नव्हती याविषयी देखील चर्चा करण्यात आली आणि प्रहार शी झालेल्या या चर्चेत देखील महिलांना लवकरच पेन्शन देण्याचे आश्वासन देखील NTPC कडून देण्यात आले आहे.


या प्रसंगी शेतकऱ्यांची मुले व शेतकरी तसेच प्रहार संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Pages