मंगळवेढा / प्रतिनिधी
हुन्नूरच्या सरपंच मनीषा मच्छिंद्र खताळ यांनी गावातील 47 कुटुंबीयांना अन्नसुरक्षा यादीत समाविष्ट करण्याबाबत मागणी केली आहे या कुटुंबावर दोन वेळा जेवणाची भ्रांत आहे या कुटुंबाचा अन्नसुरक्षा यादीत समावेश न केल्यास 4 नोव्हेंबर रोजी दीपावली सणा दिवशी हुन्नूरच्या सरपंच मनीषा मच्छिंद्र खताळ या मंगळवेढा तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण करणार आहेत असा इशारा त्यांनी लेखी स्वरूपात दिला आहे त्यांनी आपल्या अर्जामध्ये अर्जामध्ये तहसील कार्यालयाच्या स्तरावरून चौकशी करून शिधापत्रिकाधारकांची नावे दिनांक 01/ 11 2021 पर्यंत अन्नसुरक्षा यादीत समाविष्ट करावेत अन्यथा दिपवाली न साजरा करता दिनांक 04/ 11/ 2021रोजी सरपंच मनीषा मच्छिंद्र खताळ व शिधापत्रिकाधारक खंडू करे,परशुराम होनमोरे, शालन ठोकळे,महादेव पाटील,रामचंद्र पुजारी, पांडुरंग चौगुले,शांताबाई माने,धनश्री पाटील,जकाप्पा पुजारी,दामोदर कदम, तात्यासाहेब माने,सोमराया पुजारी, सोपान घाडगे,भिवाजी नरळे,माया शिंदे,कुसुम ननवरे,भागाबाई पुजारी, बन्सीलाल खडतरे,कृष्णा इंगोले,नाथा यमगर,शंकर चंदनशिवे,इंदुमती चंदनशिवे,उमा चंदनशिवे,यशोदा खुळे, रतन गोडसे, महादेव जाधव, सविता माळवे, कल्पना इंगोले, पिराजी जगताप, सुनिता चौगुले, हिराबाई इंगोले,संगीता शिवशरण,गोरखनाथ इंगोले,विठ्ठल साळुंखे,सविता पुजारी ,रंजना पुजारी, फुलाबाई पुजारी, राजकुमार घाडगे, मधुमती खाडे, राधाबाई बंडगर, विमल बंडगर ,अफसना सुतार, तानाजी कांबळे, जगदेवी पाटील, सुनिता चौगुले, आंबुबाई क्षिरसागर,
सर्वजण अमरण उपोषणाला बसणार असल्याची माहिती दिली.