सामाजिक बांधिलकी जपत शिवाई नवरात्र मंडळाचा स्तुत्य कार्यक्रम - Pantnagari Times

Breaking News

Sunday, October 10, 2021

सामाजिक बांधिलकी जपत शिवाई नवरात्र मंडळाचा स्तुत्य कार्यक्रम

     
वैराग / मुजम्मिल कौठाळकर

 वैराग येथील शिवाई नवरात्र महोत्सव मंडळाच्यावतीने कोराना काळात ज्यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता सामाजिक बांधिलकी जपून सेवा केली व अनेकांचे प्राण वाचविले. तसेच अनेक सामाजिक संस्थानी कोराना रुग्नास सर्वतोपरी मदत केली अशा कोरोना योध्दाचा सन्मान करणे गौरवच आहे. अशा कोरोना योध्दाचा सन्मान मानाचा फेटा बांधून श्रीफळ, पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देवून करण्यात आला. 
              डॉक्टर, आरोग्य सेविका, पत्रकार, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, पोलीस कर्मचारी, सफाई कामगार, नगरपंचायत कर्मचारी, एम.एस.ई.बी. कर्मचारी व स्वयंमसेवी संस्था व तसेच गावातील तरुण ज्यांनी कोरोना काळात कोरोना सेंटर मध्ये सामाजिक बांधिलकी जपत ज्यांनी सेवा दिली अशा सर्वांचा सत्कार शिवाई नवरात्र मंडळाच्या माध्यमातून करण्यात आला. 
                कोरोना रुग्नास रक्ताची गरज ओळखून भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबीराचे उद्घाटन जि.प. चे मा. सदस्य मा. संतोष (दादा) निंबाळकर, जि. प. आरोग्य व शिक्षण मंडळाचे मा. अध्यक्ष मा. मकरंद निंबाळकर, वैराग ग्रामपंचायतचे मा. उपसरपंच संजय भुमकर, वैराग ग्रा.पं. चे मा. सदस्य अरुण सावंत, सौ. शलाका मरोड-पाटील, नंदु पांढरमिसे, शिवाजी सुळे, नाना धायगुडे, पप्पू भालशंकर,समाधान पवार, ऐहमद शेख, किशोर सोनवणे यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आला. त्यांनतर मान्यवरांच्या हस्ते कारोना योध्दाचा सत्कार करण्यात आला. 
              यावेळी मंडळाचे संस्थापक मा. संतोष (आण्णा) गणेचारी, मंडळाचे अध्यक्ष धनंजय गरड, उपाद्यक्ष शाबुद्दीन सय्यद व पदाधिकारी यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन पत्रकार महेंद्र लोंढे यांनी केले तर आभार भैय्या गणेचारी यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते लयेकत सय्यद, गणेश धोकटे, सुशील जाधव, मॅचिंद्र गवळी, विलास मस्के, अंकुश सवर, भाऊ लोकरे, सागर पवार, विकास मगर, अमोल धोकटे, नागेश कोल्हे, पपू गुंजाळ, बाबा स्वामी, बल्लू मणियार,आलम सय्यद,अभिजित पवार, यांनी परीश्रम घेतले. यावेळी वैराग मधील अनेक नागरीक उपस्थित होते.

Pages