आमदार राजाभाऊ राऊत यांच्या आंदोलनाच्या इशा-यानंतर अतिवृष्टी अनुदान यादीत बार्शी तालुक्याचा समावेश ... - Pantnagari Times

Breaking News

Friday, October 29, 2021

आमदार राजाभाऊ राऊत यांच्या आंदोलनाच्या इशा-यानंतर अतिवृष्टी अनुदान यादीत बार्शी तालुक्याचा समावेश ...


वैराग/ मुजम्मिल कौठाळकर

आमदार राजाभाऊ राऊत यांच्या न्यायालयीन लढाई, मोर्चा, आंदोलनाच्या इशा-यानंतर अतिवृष्टी अनुदान यादीत बार्शी तालुक्याचा समावेश.

 ऑगस्ट ते सप्टेंबर, ऑक्टोंबर २०२१ या कालावधीत अतिवृष्टीमुळे नुकसानीच्या भरपाईपोटी बार्शी तालुक्यातील 46752 शेतकरी व क्षेत्र 42188 हेकटर या शेतकऱ्यांना 49 कोटी 24 लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. यातील 36 कोटी 93 लाख रुपये शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात वितरित करण्याचे आदेश आज करण्यात आले आहेत.

अतिवृष्टी अनुदान यादीत उर्वरित ४ मंडलांच्या समावेशासाठी, शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आमदार राजाभाऊ राऊत यांचा शासनदरबारी पाठपुरावा सुरू असून, याकरिता ते वेळप्रसंगी न्यायालयात जाणार, मोर्चा आंदोलन करणार आहेत. शेतकरी बांधवांनी काळजी करू नये, असे आवाहन आमदार राजाभाऊ राऊत यांनी केले आहे.

तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान दिल्याबद्दल आमदार राजाभाऊ राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब आणि मदत व पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार साहेब, विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस साहेब, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील साहेब यांचे आभार व्यक्त केले.

Pages