कार्यकर्ता भक्कम व बळकट झाल्याशिवाय पक्ष बळकट होत नाही डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील हुन्नूर येथील युवक नेते प्रशांत साळे यांनी आयोजित केलेल्या काँग्रेस मेळाव्याने परिसरातील कार्यकर्त्यांना मिळाली ऊर्जा - Pantnagari Times

Breaking News

Friday, October 8, 2021

कार्यकर्ता भक्कम व बळकट झाल्याशिवाय पक्ष बळकट होत नाही डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील हुन्नूर येथील युवक नेते प्रशांत साळे यांनी आयोजित केलेल्या काँग्रेस मेळाव्याने परिसरातील कार्यकर्त्यांना मिळाली ऊर्जा


 

मंगळवेढा / मदार सय्यद


मंगळवेढा तालुक्यात खऱ्या अर्थाने काँग्रेस पक्षाची बांधणी करायची असेल तर ग्रामीण भागातील कार्यकर्ता भक्कम करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सोलापूर जिल्हाध्यक्ष डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनी हुन्नूर तालुका मंगळवेढा येथे कार्यकर्ता मेळाव्यात बोलतांना व्यक्त केले


माजी समाज कल्याण सभापती सुशीला साळे यांच्या निवासस्थानी मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळावा व नुतन जिल्हा अध्यक्ष डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला

:याप्रसंगी अर्जुनरावं पाटील नंदकुमार पवार पुंडलिक साळे प्रशांत साळे, मारुतीराव वाकडे मुबारक शेख हुन्नूरचे उपसरपंच प्रवीण साळे दादा पवार दिलीप जाधव काकासो मिस्कर एकनाथ होळकर शशिकांत काशीद देवापा पूजारी देकापा माने दिलीप खडतरे महावीर खडतरे आदी मान्यवर उपस्थित होते याप्रसंगी प्रशांत

साळे यांनी नूतन जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील यांचा सत्कार केला

याप्रसंगी बोलताना धवलसिंह मोहिते पाटील म्हणाले की मंगळवेढा तालुका हा कॉंग्रेस विचारधारेचा तालुका आहे काँग्रेस पक्ष संपला आहे की काय असे वाटत असतानाच नानासाहेब पटोले सारखा खंबीर प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्रात काँग्रेस पक्षास मिळाल्याने आज पक्षाला महाराष्ट्रात नवसंजीवनी प्राप्त झाली असून

सोलापूर जिल्ह्यातील  काँग्रेस पक्षात आलेली मरगळ दूर करण्याची जबाबदारी माझ्यावर आली आहे माझ्या वडिलांनी त्यांच्या काळात कमावलेली माणसं मला आता पक्षबांधणीसाठी महत्त्वाची ठरत आहे काँग्रेस पक्ष बळकट करायचा असेल तर तळागळातील कार्यकारणी बळकट करणे गरजेचे आहे  नेत्यासाठी कार्यकर्ता अहोरात्र पळत असतो परंतु नेते मजबूत झाले की इतर पक्षात जातात असा अनुभव आहे त्यामुळे भविष्यात समाजामध्ये समाजकारण करताना स्वतःच्या संसारातील भाकरी मोडून जो कार्यकर्ता पक्षासाठी पळत असतो

अशा कार्यकर्त्याला येणाऱ्या निवडणुकांमध्ये संधी मिळाली पाहिजे संघटनात्मक व पक्षबांधणीसाठी भविष्यात जे कार्यकर्ते महत्वाची भूमिका बजावतील यांचा जिल्हा परिषद व पंचायत निवडणुकीसाठी प्राधान्याने विचार केला 

जाणार असल्याने तालुक्यातील गटामध्ये व गणांमध्ये कार्यकर्त्यांनी 

संघटनात्मक व बुथ् बांधणीसाठी कामाला लागावे असे धवलसिंह मोहिते-पाटील यांनी यावेळी सांगितले

याप्रसंगी हुन्नूर भोसे मानेवांडी महमदाबाद् लोणार पडोळकरवाडी मानेवाडी आदी परिसरातील काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते

युवक नेते प्रशांत साळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की राष्ट्रीय काँग्रेस पक्ष्याने तळागाळातील कार्यकर्त्यांना व शेतकऱ्यांना न्याय दिला असून येणाऱ्या काळात मंगळवेढा तालुक्यात पक्ष मजबुती चे कार्य करणार असल्याची ग्वाही दिली

Pages