वैराग / मुजम्मिल कौठाळकर
पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन मुंबई येथील एसआरपीएफ जवानाने गोळी बार केल्याची घटना सोलापुर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील भांतबरे येथे घडली आहे .
यात हकीकत अशी की दिनांक 20/ 10/2021 रोजी रात्री 22/45 वा.चे सुमारास यातील संशयित आरोपी नामे गोरोबा तुकाराम महात्मे (एसआरपीएफ पोलीस मुंबई ) सध्या राहणार भातंबरे तालुका बार्शी यांनी पत्नीचे चारित्र्यावर संशयाचा राग मनात धरून त्याचे जवळील सरकारी पिस्टल ने गोळीबार करून नितीन बाबुराव भोसकर यास ठार मारले आहे तसेच बालाजी महात्मे यास जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने गोळी मारून गंभीर जखमी करून फिर्यादी नामे काशिनाथ विश्वनाथ काळे व अमर जालिंदर काकडे असे दोघांना देखील गोळीबार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे अशी माहिती वैराग पोलिसांनी दिली आहे. सदर गुन्ह्यात पोलिसांनी एसआरपीएफ पोलीस गुरूबा तुकाराम महात्मे यास ताब्यात घेऊन गुन्ह्यात वापरलेली 1 पिस्टल 4 खालीकेस व 26 जिवंत राउंड जप्त केले आहेत . गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विनय बहिर हे करीत आहेत .