किरकोळ कारणावरून व्यक्तीस जिवे मारण्याचा प्रयत्न आरोपी पोलिस प्रशासनाला सापडेना...❓ - Pantnagari Times

Breaking News

Wednesday, October 20, 2021

किरकोळ कारणावरून व्यक्तीस जिवे मारण्याचा प्रयत्न आरोपी पोलिस प्रशासनाला सापडेना...❓


 

किल्ले धारूर / प्रतिनिधी


धारूर तालुक्यातील सोनिमोहा येथे किरकोळ कारणावरून दि. १७/१०/२०२१ रोजी सकाळी ११ वा दरम्यान एका व्यक्तींस जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. 

या प्रकरणी अशोक वैजनाथ तोंडे यांच्या फिर्यादीवरून धारूर पोलीस ठाण्यात बालासाहेब तुळसीराम तोंडे, तुळसीराम नामदेव तोंडे,गजराबाई तुळसीराम तोंडे,संगिता बालासाहेब तोंडे,यांच्या विरुद्ध धारूर पो.स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

धारूर पोलीस ठाण्यात आरोपी बालासाहेब तुळसीराम तोंडे,तुळशीराम नामदेव तोंडे, गजराबाई तुळसीराम तोंडे,संगिता बालासाहेब तोंडे,यांच्या विरोधात  भारतीय दंड विधान कलम ३०७,३४१,३२३,५०४,५०६,अ ३४  नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.१९ तारखेला फिर्यादीनुसार यांनी किरकोळ कारणावरून भास्कर तोंडे यांना कोर्हाडी,लाता बुक्या,शिवीगाळ करून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.या घडीला भास्कर तोंडे आता खाजगी सह्याद्री दवाखान्यामध्ये आय सियू मध्ये उपचार घेत आहेत.तरी पोलिस प्रशासनाकडून आत्तापर्यंत  एकही आरोपीस पकडण्यात यश आलेले दिसून येत नाही.या घटनेचा तपास फौजदार पालवे हे करत आहेत.

Pages