मंगळवेढा उपसासिंचन योजनेच्या दोन टीएमसी पाण्यास शासनाची मंजुरी : भगीरथ भालके - Pantnagari Times

Breaking News

Wednesday, October 6, 2021

मंगळवेढा उपसासिंचन योजनेच्या दोन टीएमसी पाण्यास शासनाची मंजुरी : भगीरथ भालके


 

मंगळवेढा / प्रतिनिधी

तालुक्याचा दुष्काळी कलंक पुसण्यासाठी तेरा वर्षापासून स्व आ भारत भालके यांनी केलेला संघर्ष आता विजयामध्ये रूपांतरित झाला असून बुधवारी झालेल्या उजनी प्रकल्पाच्या पाणीवापराच्या फेर नियोजन बैठकीत शासनाने मंगळवेढा उपसा सिंचन योजनेसाठी अधिकृत आदेश काढत दोन टीएमसी पाणी तरतूद केली असल्याने या कामासाठी महाविकास आघाडी सरकारचे मतदार संघाच्या वतीने आभार मानत असल्याची माहिती जिल्हा नियोजन सदस्य भगीरथ भालके यांनी दिली बुधवारी मुंबई येथे जलसंपदा विभागाच्या वतीने उजनी धरणातील पाणी वापराच्या फेर नियोजनाबद्दल आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून सन 2021च्या सुधारित ताळेबंदासाठी प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठीचा प्रस्ताव कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून प्राप्त झाल्यानंतर प्रकल्प अहवालानुसार 2388.09 दलघमी पाण्याचे नियोजन करण्यात आल्याचा शासन निर्णय झाला आहे 2019 च्या तृतीय सुप्रमा अहवालानुसार मंगळवेढ्याच्या उपसा सिंचन योजनेसाठी 28.598 दलघमी इतके पाणी मंजूर करण्यात आले होते मात्र हा तालुक्यावर होणारा अन्याय असल्याचे स्व आ भारत भालके यांनी महाविकास आघाडी सरकार मध्ये जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर याबाबत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या दालनात या योजनेतील गावे व 2 टी.एम.सी.पाणी हे पूर्ववत ठेवण्याच्या अटीवर बैठक घेत जलसंपदामंत्री पाटील यांनी यास मान्यता दिली.यावर बंदिस्त पाइपलाइनद्वारे 21 हजार 358 हेक्‍टरचे सर्वेक्षण करण्यासाठी निविदा कृष्णखोरे महामंडळाने उघडली व सर्वेक्षण सुरू झाले पाणी वाटपाबाबत झालेल्या बैठकीत आता मंगळवेढ्याच्या योजनेसाठी 57.763 दलघमी पाणी मंजुर झाले आहे

2014 साली जवळपास 560 कोटी रुपयाच्या योजनेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली. यावेळी तत्कालीन राज्यपालांकडून खास बाब म्हणून ही योजना अस्तित्वात आणून दाखवल्याने मतदारसंघात भालके यांच्या कार्याबद्दल विश्वास बळावला होता यानंतर राज्यात सत्ता बदल झाल्यामुळे सरकारने ही योजना गुंडाळून टाकण्याचे प्रयत्न सुरू केले होते मात्र स्व आ भालके यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावत या योजनेसाठी प्रयत्न सुरूच ठेवले होते मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागातील शेतकर्याच्या आशा महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयामुळे आशा पल्लवित झाल्या असून येत्या काही दिवसात या योजनेच्या कामास सुरवात होणार आहे .स्व.भारतनानांचे अपूर्ण असलेले काम मार्गी लावण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार,मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार,जलसंपदामंत्री जयंत पाटील, मंत्री अशोक चव्हाण पालकमंत्रि दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून प्रयत्न करून या योजनेच्या पूर्ततेसाठी दुष्काळी गावाला पाणी मिळवून देण्यासाठी आदरणीय खा शरद पवार साहेबांसह महाविकास आघाडीकडे सातत्याने प्रयत्न चालू असल्याचे भगीरथ भालके यांनी सांगितले 

Pages