किरीट सोमय्यांनी मराठा समाजाची बदनामी करणे थांबवावे अन्यथा राज्यात फिरकु देणार नाही : मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक शिवस्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप मुटकुळे यांचा इशारा - Pantnagari Times

Breaking News

Saturday, October 9, 2021

किरीट सोमय्यांनी मराठा समाजाची बदनामी करणे थांबवावे अन्यथा राज्यात फिरकु देणार नाही : मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक शिवस्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप मुटकुळे यांचा इशारा


 

पंढरपूर / प्रतिनिधी

भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी मराठा समाजातील नेते,उद्योजक,शासकीय अधिकारी यांना नाहक बदनाम करण्याची सुपारी घेतली आसुन ते वारंवार मराठ्यांच्या विरोधात गरळ ओकत आहेत.त्यांनी मराठा समाजाची बदनामी थांबवावी अन्यथा मराठा क्रांती ठोक मोर्चा त्यांना राज्यात फिरकु देणार नाही तसेच त्यांना त्यांची जागा दाखवुन दिल्या शिवाय स्वस्त बसनार नाही असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक व शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप मुटकुळे यांनी दिला आहे.किरीट सोमय्या हे मराठा द्वेषी असुन त्यांना भाजपच्या मंडळींनी आवर घालुन गप्प करावे महाराष्ट्रातील मराठ्यांनी इतिहास घडवला असुन अटकेपार झेंडे लावले आहेत.सोमय्या यांनी मराठा समाजाची जाहिर माफी मागावी अशी मागणीही मराठा क्रांती ठोक मोर्चा व शिवस्वराज्य युवा संघटने केली आहे.गुजरातची काही मंडळी महाराष्ट्रावर कब्जा करण्याच्या प्रयत्नात असल्याच दिसुन येत असुन आम्ही छञपती मावळे कदापी हे खपवुन घेणार नाही.काही गुजराती महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्राचे खातात,मोठे होऊन मराठ्यांन विरोधात बोलतात हे मराठा समाज खपवुन घेणार नसुन सोमय्या तुम्हाला योग्यवेळी योग्य उत्तर मराठा समाज देणार आहे.मराठा समाजातील उपमुख्यमंञी अजितदादा पवार,पार्थ पवार यांच्यासह समाजातील अनेक मंडळींना पोकळ धमक्या देणे बंद करावे,अजीतदादा पवार हे स्पष्ट व सरळ व्यक्तीमत्व असुन महाराष्ट्राच्या विकासामध्ये त्यांचे मोठे योगदान आहे.मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसदर्भात अजितदादा नेहमी पुढाकार घेऊन समाजाची बाजु मांडत असतात.तसेच पार्थ पवार यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणुन स्वा:त सुप्रिम कोर्टात याचिका दाखल केली होती.मराठा समाजाच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी कशाचीही पर्वा न करता राजकारन बाजुला ठेवुन पार्थ पवार यांना समाजाची तळमळ असते.अजित दादांच्या भगिणी म्हणजे आमच्या देखिल भगिणी असुन त्या जिजाऊंच्या लेकी आहेत.छञपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात जिजाऊंच्या लेकींना बदनाम करण्याचे कटकारस्थान जे चालु आहे ते कदापी मराठा जमाज खपवुन घेणार नाही.

तसेच महाराष्ट्रातल्या तमाम तरुण-तरुणींच्या हृदयस्थानी असलेले मराठा आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्याबद्दल आपण जे आरोप करत आहात ही राजकारणाची अतिशय खालची पातळी म्हणावी लागेल.आपण प्रशासकीय अधिकाऱ्यावर असे बेछूट आरोप करून तुमची व तुमच्या पक्षाची सत्तेसाठी कोणत्या थराला जाऊ शकतात हे आपण आज सिद्ध केले आहे.या कृतीचा मराठा क्रांती ठोक मोर्चा तीव्र शब्दात जाहिर निषेध करीत असुन सोमय्या यांना महाराष्ट्र फिरू देणार नाही असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक व शिवस्वराज्य युवा संघटनेचे संदीप मुटकुळे यांनी दिला आहे

Pages