वैराग येथील पेशवेकालीन तलाव परिसराचे रुपडे पलटवार,हिंगणी रस्ता अतिक्रमण नगरपंचायतीने हटविले - Pantnagari Times

Breaking News

Thursday, October 28, 2021

वैराग येथील पेशवेकालीन तलाव परिसराचे रुपडे पलटवार,हिंगणी रस्ता अतिक्रमण नगरपंचायतीने हटविले

 
वैराग/ मुजम्मिल कौठाळकर

वैराग येथील पेशवेकालीन तलाव परिसराचे रुपडे पलटवार,हिंगणी रस्ता अतिक्रमण नगरपंचायतीने हटविले
 वैराग शहरातील हिंगणी रोड व गावतलाव लगत असलेले अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात काढण्यात आले. सदर अतिक्रमण धारकांना यापूर्वी वारंवार नोटीस देण्यात आल्या होत्या व स्पीकरद्वारे स्वयंस्फूर्तीने अतिक्रमण काढणेविषयी सूचना देण्यात आल्या होते. यातील बऱ्याच अतिक्रमण धारकांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घेतले होते. उर्वरित ..नऊ.....अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण कारवाई मध्ये काढण्यात आले.हिंगणी रोड वरील मटन दुकानांचे सर्व अतिक्रमणे स्वयंस्फूर्तीने दुकानदाराःनी स्वतः काढले होते.
सदर गाव तलावालगतचे अतिक्रमण काढणेकरीता सार्वजनिक बांधकामविभागाकडून पञव्यवहार झाला होता.सदर गाव तलाव व परिसर वैराग नगरपंचायत आख्त्यारीतील आसल्याने व तत्कालीन वैराग ग्रामपंचायतीने सदर परीसर सुशोभिकरणाकरीता महाराष्ट्र शासन पर्यटन विभागास नाहरकत प्रमानपञ व हमीपञ सादर केले हैते.गाव तलाव या ऐतिहासिक गावतलावाच्या सुशोभिकरणाकरिता 5.5 म्हणजे च साडे पाच कोटी रूपये मंजूर असून त्याद्वारे वाँकिंग ट्रँक',वृक्षलागवड,परीसर सुशोभिकरण होऊन वैराग शहरात गाव तलाव परिसर सुंदर व सोयी सुविधांनी सुसज्ज केला जाणार आहे.सदर काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येणार आहे .त्यावेळी वैराग नगरपंचायतीचे मुख्याधिकारी वीणा पवार, कार्यालयीन अधीक्षक सुवर्णा हाके, वैराग पोलीस स्टेशन चे ए.पी.आय सारिका गटकुळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता आर.एन. बिद्री साहेब, हवालदार सदाशिव गवळी, गणेश नाळे, सुरेखा थिटे, स्वाती बोंदर, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे वायरमेन गणेश आवारे, बिरमल काळे तसेच नगरपंचायत कर्मचारी रामभाऊ जाधव, विलास मस्के, हसनअली शेख, सुदाम खेंदाड, प्रशांत वाघमारे, सचिन पानबुडे, रफिक शेख, आण्णासाहेब जगताप, दत्तात्रय मस्के, इसाक तांबोळी व इतर कर्मचारी उपस्थित होते.

Pages