हुन्नूर येथे लोकर व भंडाऱ्याची उधळण करत झाली बिरोबा-महालिंगरायाची पालखी भेट - Pantnagari Times

Breaking News

Wednesday, October 27, 2021

हुन्नूर येथे लोकर व भंडाऱ्याची उधळण करत झाली बिरोबा-महालिंगरायाची पालखी भेट


 

मंगळवेढा/ प्रतिनिधी

हुन्नूर ता. मंगळवेढा येथील ग्रामदैवत गुरु बिरोबा आणि हुलजंती येथील शिष्य महालिंगराया यांच्या भेटीचा सोहळा भाविकांच्या उपस्थितीत पार पडला बिरोबा महालिंगरायाच्या नावानं चांगभलं आणि भंडारा बरोबर लोकरीच्या उधळणीने आसमंत दुमदुमून गेला होता जिकडे पाहील तिकडे भंडाऱ्याने माखलेले भाविक दिसत होते गुरू-शिष्याच्या भेटीचा सोहळा पाहण्यासाठी भाविकांच्या नजरा रोखून धरल्या होत्या सकाळी सात वाजता महालिंगरायाची पालखी हुन्नूरच्या ओड्यात असणाऱ्या ठानका वर आणली बरोबर सात वाजता बिरोबा आणि महालिंगरायाची पालखी निघाल्या सोबत भंडारा खोबऱ्याची आणि लोकरीची उधळण करीत भाविक चालत असतात त्यातच  चांगभलेच्या निनादात ढोल झांजाचा आवाज हलगी डफ संबळ च्या आवाजाने आसमंत दुमदुमून सोडत होते बिरोबाची पालखी पाळी घड्या घालत मंदिरातून भेटीच्या मैदानात येते व महालिंगरायाची पालखी ही ओढ्यातून भेटीच्या मैदानात येते दोन्ही पालखी गळाभेटीसाठी आतुर झालेल्या असतात बरोबर साडे सात वाजता दोन्ही पालखी ची समोरा समोर गळाभेट होते भाविक भक्त पालखीचे स्वागत करतात भेट होताच भाविकांनी टाळ्यांचा कडकडाट केला परत एकदा भंडारा लोकर खोबऱ्याची उधळण करण्यात येते सर्वांच्या तोंडी बिरोबा महालिंगराया च्या नावानं चांगभलं ऐकायला मिळत होते हा भेटीचा सोहळा वर्षातून एकदा भरत असतो गेल्या दहा दशकापासून गुरु व शिष्याची भेटीची परंपरा चालू आहे यानंतर भाविकांनी देवाला नारळ भंडारा पुरण पोळीचा नैवद्य दाखवण्यात आला. 

बिरोबा-महालिंगराया या दोन्ही देवाची पालखी मंदिरात गेल्यावर जावळाच्या पुजार्‍यानी पुढे काय होणार याची पन्नास देवाच्या पूजारीनी  भाकणूक सांगितली त्यात शेळी मेंढी चे दर तेजीत राहतील रोग आलाय पण घेऊ नका मी तुम्हाला कांबळत झाकून नेईल अशी मराठी व कन्नड मध्ये भाकणूक सांगण्यात आली. 

कोरोना महामारीच्चा आजारामुळे सायंकाळी पाच वाजता होणारी भेट सकाळी सात वाजता घेण्यात आली यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील पोलीस निरीक्षक जोतिराम गुंजवटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजीत आवटे, ए.पी.आय.बापू पिंगळे, ए.पी.आय. शेटे आदीनी चोख बंदोबस्त ठेवला होता. 

देवस्थान कमिटी चे सर्व पदाधिकारी व गावातील ग्रामस्थांनी परिश्रम घेतले

Pages