.... प्रसिद्धीप्रमुख ताजुद्दिन(बाबा) शेख तर रफिक बेग तालुका अध्यक्षपदी यांची निवड.... - Pantnagari Times

Breaking News

Monday, October 25, 2021

.... प्रसिद्धीप्रमुख ताजुद्दिन(बाबा) शेख तर रफिक बेग तालुका अध्यक्षपदी यांची निवड....


वैराग / मुजम्मिल कौठाळकर

  वैराग मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ताजुद्दिन (बाबा) शेख यांची सोलापूर जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभागाचे प्रसिद्धी प्रमुख पदी ताजुद्दिन( बाबा) शेख यांची निवड करण्यात आली तसेच रफीक बेग यांची सोलापूर जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी पार्टी बार्शी तालुका अल्पसंख्याक पदी निवड करण्यात आली त्यांची निवड राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक सोलापूर जिल्हाध्यक्ष जाकीर हुसेन इस्माईल शेख यांनी केली आहे.
  सामाजिक कामात अग्रेसर असणारे ताजुद्दिन (बाबा) शेख व रफीक बेग यांच्या कार्याची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर ही जबाबदारी दिली आहे. आंदोलने, उपोषण आणि सामाजिक उपक्रम यामध्ये ते नेहमीच अग्रेसर असतात. ताजुद्दिन (बाबा) शेख व रफीक बेग यांचा जनसंपर्क ही दांडगा आहे.त्यांच्या निवडीची तालुक्यातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे. 

  ताजुद्दिन बाबा शेख व रफीक बेग बार्शी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस नेते निरंजन भूमकर यांचे निकटवर्तीय आहेत .

Pages