मंगळवेढा / प्रतिनिधी
नंदेश्वर (ता. मंगळवेढा) येथील रेखा सुनिल कसबे यांचे लग्नापूर्वीचे व लग्नानंतरचे अशी दोन्हीही नावे 7/12 उतार्यावर लावलेली आहेत. त्यापैकी लग्नापूर्वीचे नाव रद्द करावे म्हणून त्यांनी गेल्या दहा महिन्यांपूर्वी मा. तहसीलदार, मंगळवेढा यांच्याकडे कागदपत्राच्या पूर्ततेसह अर्ज केलेला आहे. मा. तहसिलदार यांचा आदेश असतानाही नंदेश्वरचे तलाठी बी.एस. शेख यांनी कोणतेही कारण न देता केवळ आर्थिक लाभासाठी अद्याप पर्यंत 7/12 उतार्यावर नोंद घेतलेली नाही. मा. तहसिलदार यांचा आदेश न मानणार्या व जाणिवपूर्व महिलांची कामे न करणार्या नंदेश्वरच्या बी.एस. शेख या कामचुकार तलाठ्याची खातेनिहाय चौकशी करुन निलंबित करावे यासाठी रेखा कसबे या सोमवार दि. 25/10/2021 पासून मा. तहसिलदार यांच्या कार्यालया समोर बेमुदत धरणे आंदोलन करणार आहेत.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, नंदेश्वरचे गावकामगार तलाठी बी.एस शेख यांनी चुकीची माहिती देऊन रेखा सुनिल कसबे यांच्या वडिलोपार्जित जमिनीच्या 7/12 उतार्यावर लग्नापूर्वीचे नाव रद्द करुन लग्नानंतरचे नाव लावणे आवश्यक असतना दोन्हीही नावांची नोंद केलेली आहे. या दोन्ही नावांपैकी लग्नापूर्वीचे नाव रद्द करुन मिळवावे म्हणून गेल्या दहा महिन्यांपूर्वी मा. तहसीलदार, मंगळवेढा यांच्याकडे कागदपत्राच्या पूर्ततेसह अर्ज केला आहे.
मा. तहसिलदार यांनी सर्कल चौकशी नंतर 7/12 उतार्यावर नोंद घ्यावी असा, आदेश नंदेश्वरचे तलाठी बी.एस. शेख यांना काढलेला असताना तसेच वारंवार पाठपुरावा करुनसुद्धा कोणतेही कारण न देता जाणिवपूर्वक आर्थिक लाभासाठी शेख यांनी अद्याप पर्यंत 7/12 उतार्यावर नोंद घेतलेली नाही. मा. तहसिलदार यांचा आदेश न मानणार्या व महिलांची कामे न करणार्या बी.एस. शेख या कामचुकार तलाठ्यावर खातेनिहाय चौकशी करुन त्यांना निलंबित करावे यासाठी सोमवार दि. 25/10/2021 पासून मा. तहसिलदार यांच्या कार्यालया समोर बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती नंदेश्वरच्या महिला रेखा कसबे यांनी दिली.