ऊस उत्पादकांसाठी आनंदाची बातमी !! सीताराम महाराज साखर कारखाना पंधरवाड्यास देणार ऊस बिल प्रा.शिवाजीराव काळुंगे.. - Pantnagari Times

Breaking News

Sunday, October 10, 2021

ऊस उत्पादकांसाठी आनंदाची बातमी !! सीताराम महाराज साखर कारखाना पंधरवाड्यास देणार ऊस बिल प्रा.शिवाजीराव काळुंगे..


 

मंगळवेढा / प्रतिनिधी


सीताराम महाराज साखर कारखान्यात दसरा सणाच्या मुहूर्तावर प्रत्यक्ष ऊस गाळप सुरू होणार आहे. गाळपास आलेल्या उसाला ‘एफआरपी प्रमाणे दर प्रत्येक पंधरवड्यास अदा करणेत येईल. तसेच शेतकऱ्यांनी त्यांचा ऊस इतर कोणत्याही काट्यावरुन वजन करुन कारखान्याकडे गळीतासाठी पाठवावा.


याविषयी आमची कसल्याही प्रकारची हरकत असणार नाही, अशी ग्वाही धनश्री परिवाराचे कुटूंब प्रमुख प्रा.शिवाजीराव काळुगे यांनी दिली.


कारखान्याच्या ११ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ ह.भ.प. जयवंत बोधले महाराज यांच्या हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी ते बोलत होते.


अध्यक्षस्थानी श्री श्री श्री सद्गुरू साखर कारखान्याचे चेअरमन शेषगिरीराव होते. याप्रसंगी चेअरमन शोभा काळुंगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजलक्ष्मी गायकवाड-काळुंगे, संचालक महादेव देठे, सांगोला सुतगिरणीचे चेअरमन प्रा.नानासाहेब लिगाडे, उद्योजक रामचंद्र केदार, भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत,


माजी नगराध्यक्ष पांडुरंग ताड, युवराज गडदे, यादाप्पा माळी, रमेश भांजे, जगन्नाथ कोकरे, ज्ञानदेव जावीर, राजाराम सावंत, अविनाश चव्हाण, सुभाष यादव, उध्दव बागल, माऊली जाधव,


स्नेहल मुदगल , अॅड. दिपाली पाटील, समाधान काळे, गणेश ठिगळे, सुनीता सावंत, बंडू पाटील, सोमा गुळमिरे, अॅड . शैलेश हावनाळे, संजय चौगुले, उत्तम नाईकनवरे, सरव्यवस्थापक रमेश फडतरे , रवि शिंदे प्रमुख उपस्थित होते.


प्रारंभी होमहवन पूजा प्रकाश काळुंगे व सीमा काळुगे या उभयतांच्या हस्ते झाली.


चेअरमन शोभा काळुगे म्हणाल्या, कल्याणराव काळे यांनी मोठ्या कष्टाने कारखान्याची उभारणी केली असून आता नावलौकीक वाढविण्याची जबाबदारी काळुगे परिवारावर आहे.


प्रास्ताविकात डॉ.राजलक्ष्मी गायकवाड यांनी, हंगामात ५ लाख मे . टन ऊस गाळपाचे उद्दीष्ट ठेवले असून सहवीज निर्मिती प्रकल्पातून २.२५ कोटी युनिट वीज एक्सपोर्ट होईल, असे सांगितले.


महादेव देठे म्हणाले, साखर कारखानदारीत पुरुषप्रधान संस्कृतीला छेद देत प्रा.शिवाजीराव काळुगे यांनी स्त्रियांवर मोठी जबाबदारी दिली आहे. याद्वारे स्त्री शक्तीचा सन्मान केला आहे.


यावेळी चिफ इंजिनिअर आर.व्ही.लवटे , डेप्युटी चिफ इंजिनिअर एस.बी. रोगे, मुख्य शेती अधिकारी पी . जी . शिंदे , आर.एस. वायदंडे , डी . जे . नागणे , एस.ए. घाडगे, व्ही.एम. कदम आदी उपस्थित होते.


सूत्रसंचालन प्रशासन अधिकारी डी .एम. सुतार यांनी केले , तर आभार जरनल मॅनेजर एच.ए. पाटील यांनी मानले.

Pages