शिक्षक समितीने गुणवंतांचा सन्मान करुन चांगला पायंडा पाडला :- अनिल कादे - Pantnagari Times

Breaking News

Wednesday, October 20, 2021

शिक्षक समितीने गुणवंतांचा सन्मान करुन चांगला पायंडा पाडला :- अनिल कादे


 

कुर्डूवाडी / प्रतिनिधीशैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणारे विद्यार्थी , शिक्षक तसेच कोविड संकट काळात महत्त्वाची भूमिका बजावणार्या विविध क्षेत्रातील गुणवंतांचा गौरव करुन   प्राथमिक शिक्षक समितीने चांगुलपणाला प्रोत्साहीत करणारा कार्यक्रम आयोजित करुन चांगला पायंडा सुरु केल्याचे गौरवोदगार शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष अनिल कादे यांनी काढले.

          शिक्षक समिती माढा तालुका शाखेच्या वतीने आयोजित गुणगौरव सत्कार   सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी कादे यांनी बालके , शिक्षक व पालक या सर्व घटकांतील चांगुलपणा शोधून सत्कार सोहळ्याच्या माध्यमातून सन्मानित करीत शिक्षक समितीने हा चांगुलपणा समाजासमोर आणला आहे. हा गौरव अधिक चांगल्या कार्यासाठी प्रेरक ठरेल अशा शब्दांत तालुका शाखेचे कौतुक केले . यावेळी व्यासपीठावर गटशिक्षणाधिकारी मारुती फडके , जिल्हा शिक्षक पतसंस्थेचे माजी चेअरमन विकास उकीरडे , दयानंद कवडे यांच्यासह शिक्षक समितीचे नेते राजेंद्र नवले अमोघसिद्ध कोळी , बसवराज गुरव , प्रताप काळे , सुनिल कोरे , कमलाकर धावणे , वामन बरडे , महिला आघाडीच्या वर्षा घोडके , सविता नाळे , अर्चना राऊत इ.प्रमुख मान्यवर उपस्थित  होते .

        यावेळी शिक्षक समितीचे नेते सुरेश पवार यांनी शिक्षकांना चिंतामुक्त ठेवण्यासाठी राज्य व जिल्हा  पातळीवर संघटनेच्या माध्यमातून सोडविण्यात आलेल्या विषयांची माहिती देताना शिक्षक पतसंस्थांच्या माध्यमातून शिक्षकांना आर्थिक स्थैर्य मिळवून दिल्याची माहिती दिली .तर जिल्हा उपाध्यक्ष रंगनाथ काकडे यांनी या उपक्रमाच्या प्रेरणेमुळे तालुक्याच्या गुणवत्ता वाढीला चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली .यावेळी गुणवंत विद्यार्थी , कोविड योद्धा पुरस्कार , नूतन मुख्याध्यापक  तसेच निबंध व स्वच्छ - सुंदर शाळा पुरस्कार योजनेतील यशस्वी शाळा व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. याशिवाय गटविकास अधिकारी डाॕ.संताजी पाटील यांना विशेष कोविड योद्धा पुरस्कार जाहीर करण्यात आला तर गटशिक्षणाधिकारी मारुती फडके यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

     या कार्यक्रमाचे प्रास्तविक शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष कैलास काशीद यांनी केले . तर उपस्थितांचे स्वागत  पतसंस्थेचे चेअरमन राजन सावंत , मधुकर डोंगरे यांनी केले .सूत्रसंचालन विनोद परिचारक , रामकृष्ण केदार , ढोबळे सर यांनी केले तर आभार सरचिटणीस वामन गायकवाड यांनी मानले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक समितीचे सर्व पदाधिकारी व दोन्ही शिक्षक पतसंस्थेच्या संचालक मंडळाने परिश्रम घेतले. यावेळी तालुक्यातील शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते .

Pages