नागझरी नदीतून अवैध वाळू माफियावर वैराग पोलिसांची कारवाई,सहा लाख सात हजारा मुद्देमाल जप्त - Pantnagari Times

Breaking News

Tuesday, October 19, 2021

नागझरी नदीतून अवैध वाळू माफियावर वैराग पोलिसांची कारवाई,सहा लाख सात हजारा मुद्देमाल जप्त


वैराग/मुजम्मिल कौठाळकर

वैराग पोलिसांनी नागझरी नदी पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या चार जणांवर कारवाई करत त्यांच्याकडून बिगर नंबर चा ट्रॅक्टर ट्रॉली सह सहा लाख सात हजाराचा ऐवज १८ ऑक्टोबर रोजी पेट्रोलिंग करत असताना ताब्यात घेतला आहे. अशी माहिती वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनय बहिर यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैराग पोलीस हत्तीज हद्दीत पेट्रोलिंग करित असताना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मौजे हत्तीज येथील नागझरी नदी पात्रात वाळू उपसा होत आहे अशी बातमी मिळाल्याने नदिपात्रात गलो असता, तेथे एक निळ्या रंगाचा न्यु-हलंड कंपनीचा बिगर नंबरचा ट्रक्टर व बिगर नंबरची ट्रली अवैद्यरित्या नदिपात्रात वाळू भरत असताना दिसला त्यास आमची चावूल लागताच चार इसम अंदाराजाचा फायदा घेवून पळून गेले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला असता अंधार असल्याने पळून गेले, ती वेळ 00/30 वा ची होती सदर पळवून गेलेले चार इसम आजूबाजूला चौकशी केली असता 1) चालक कृष्णा नवनाथ काळे 2) अमोल राऊत 3) आण्णा बोकडे 4) रामा मंडलिक( ट्रक्टर मालक) सर्व रा. हत्तीज ता. बार्शी असे असल्याचे समजले.

  सपोफौ/ हळे यांनी घटनास्थळी दोन पंचास बोलावुन घेवुन त्यांना बोलावुन घेवुन बातमीतील सर्व हकीकत सांगुन ती पंच म्हणुन काम करण्यास तयार झाल्याने आम्ही घटनास्थळावर असलेला एक निळ्या रंगाचा न्यु-हलंड कंपनीचा बिगर नंबरचा ट्रक्टर त्याचा चेसी एन. एच. 48181820बी व त्याचा इंजीन नं 303966DX व निळ्या रंगाची दोन चाकी बिगर नंबरची ट्रली याची पाहणी केली असता त्यामध्ये आम्हास अंदाजे एक ब्रास वाळु दिसुन आली व सदर ट्रक्टरची पाहणी केली असता त्यामध्ये पुढील प्रमाणे मुद्देमाल मिळुन आला तो खालील प्रमाणे 1)7000/- रू किंमतीचे 1 ब्रास वाळु किं अं2)600000/-एक निळ्या रंगाचा न्यु-हलंड कंपनीचा बिगर नंबरचा ट्रक्टर त्याचा चेसी एन. एच. 48181820बी व त्याचा इंजीन नं 303966DX व निळ्या रंगाची दोन चाकी बिगर नंबरची ट्रली सह किं अं 607000/- एकुण रू येणेप्रमाणे यात नमुद वर्णनाचा व किंमतीचा मुद्देमाल (वाहन) पंचासमक्ष सपोफौ/ हळे यांनी ताब्यात घेवुन पोलीस ठाणेस आनुण लावले आहे. तरी वरील तारखेस वेळी व ठिकाणी यातील इसम नामे 1) चालक कृष्णा नवनाथ काळे 2) अमोल राऊत 3) आण्णा बोकडे 4) रामा मंडलिक( ट्रक्टर मालक) सर्व रा. हत्तीज ता. बार्शी यांनी शासनाचा कसलाही प्रकारचा पास परवाना न घेता अगर रयल्टी न भरता पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे हे माहीत असुन सुध्दा स्वत:च्या फायद्यासाठी चोरून घेवून जात असताना मिळून आला म्हणुन त्यांचे विरूध्द सरकारतर्फे भा.द.वि.कलम 379, पर्यावरण संरक्षण अधिनियम9व15 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास वैराग पोलीस करत आहेत.

Pages