वैराग / मुजम्मिल कौठाळकर
वैराग येथे रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट जनावरांच्या कळपांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो यामुळे अपघाताची शक्यता, वैराग नगरपंचायतीच्या मात्र दुर्लक्ष
बार्शी-सोलापूर रोडचे काम सुरू असून रहदारी साठी एक पदरी काम चालू आहे. रस्त्यावरील या जनावरांमुळे सामान्य माणूस मात्र त्रस्त होते आहे. छत्रपती शिवाजी चौक पासून बसस्थानकाकडे जाण्यासाठी महत्त्वाचा रस्ता आहे . त्यामुळे या रस्त्यावर सातत्याने वर्दळ असते मात्र या रस्त्यावर मोकाट जनावरे फिरत असल्यामुळे येथील अनेक वाहनाला अचानक ब्रेक मारावा लागतो. त्यामधून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही या चौकात जनावरे रस्त्याच्या मधोमध बसलेले असल्यामुळे अनेकदा वाहतुकीचा खोळंबते.
छत्रपती शिवाजी चौक ते बसस्थान या भागातही मोकाट जनावरांचे कळप मोठ्या प्रमाणात दिसतात. रस्त्यावर भाजीबाजार भरतो त्यामुळे भाजी विक्रीत्यांनी खराब झालेली भाजी फेकून दिल्यानंतर ती खाण्यासाठी येथे जनावरांचा कळपच उभा असतो याचाही वाहतुकीला अडथळा होत असून त्याचा नागरिकांना त्रास होत आहे. बार्शी -सोलापूर मुख्य चौकातील रस्त्याचं काम लवकरात लवकर व्हावे व जनावरांचा वैराग नगरपंचायतीने बंदोबस्त करावा असे येथील नागरिक बोलत आहे.