अक्कलकोट / प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या अक्कलकोट तालुकाध्यक्ष पदी जेऊर गावचे सुपुत्र व शिक्षक समितीचे नेते शंकर अजगोंडे यांची कार्यकारिणी सभेत एकमताने निवड करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष अनिल कादे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पतसंस्थेच्या अक्कलकोट येथील सभागृहात कार्यकारिणी बैठकीत ही निवड एकमताने करण्यात आली.
या प्रसंगी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे मा.संपर्कप्रमुख सुरेश पवार,पुणे विभागीय अध्यक्ष दयानंद कवडे,पुणे विभागीय संघटक दत्तात्रय पोतदार,जिल्हा सरचिटणीस अमोगसिद्ध कोळी,जिल्हा कोषाध्यक्ष रमेश खारे, मंगळवेढयाचे नेते चंद्रकांत पवार,शिक्षक नेते राजशेखर उंबराणीकर इत्यादी प्रमुख नेते उपस्थितीत होते .
यावेळी सिद्धाराम बिराजदार यांनी नूतन तालुकाध्यक्षपदी शंकर मल्लिनाथ अजगोंडे यांच्या नावाची सूचना मांडली.त्यास संपूर्ण सभागृहाने टाळ्यांच्या गजरात आनुमोदन दिले . यावेळी जिल्हाध्यक्ष अनिल कादे यांच्या शुभहस्ते शंकर मल्लिनाथ आजगोंडे यांना तालुकाध्यक्षपदी निवडीचे पत्र देऊन शाल,फेटा आणि श्रीफळ देऊन सत्कार केला.
अजगोंडे यांच्या रुपाने अक्कलकोट तालुका प्राथमिक शिक्षक समितीने धडाडीच्या कार्यकर्त्याला योग्य वेळी संधी देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.याप्रसंगी अक्कलकोट तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न अधिक जोमाने सोडविण्यासाठी संघर्षरत राहून कामकाज करणार असल्याचा मनोदय नूतन तालुकाध्यक्ष शंकर अजगोंडे यांनी बोलून दाखविला. यावेळी सुमारे सव्वाशेहून अधिक पदाधिकारी , कार्यकर्ते उपस्थित होते .