भीमा कारखाना चालला पाहिजे व कामगारांचे प्रपंच ही चालले पाहिजेत:- प्रभाकर देशमुख - Pantnagari Times

Breaking News

Thursday, October 14, 2021

भीमा कारखाना चालला पाहिजे व कामगारांचे प्रपंच ही चालले पाहिजेत:- प्रभाकर देशमुख


मोहोळ / प्रतिनिधी

   कारखान्यातील कामगारांनीं 15 दिवस काम बंद आंदोलन केल होतं भैया देशमुख यांच्या आवाहनाला मान देऊन कामाला सुरुवात केली मोहोळ तालुक्यातील मौजे टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्यांमध्ये गेल्या 24 महिन्याच्या कष्टकरी कामगारांचे पगार अद्याप त्यांच्या खात्यावर जमा केले नाहीत तसेच इतर विविध समस्यांमुळे ग्रासून गेलेल्या कामगारांना जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैय्या देशमुख यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन कारखाना स्थळी बैठक घेऊन आधार दिला व कारखान्याची परिस्थिती समजावून सांगत कारखान्याचे चेअरमन मुन्ना साहेब महाडिक या कामगारांच्या समस्या बाबत व थकित पगारी बाबत सकारात्मक तोडगा काढून निर्णय घेतील असा विश्वास देशमुख यांनी बोलताना व्यक्त केला मुन्ना साहेब महाडिक यांनी दोन ते तीन दिवसात समाधान कारक तोडगा नाही काढल्यास जनहित शेतकरी संघटना कामगारांसाठी रस्त्यावर उतरणार असेही बोलायला देशमुख विसरले नाहीत मुन्ना साहेब महाडिक भीमा कारखान्यावर दोन ते तीन दिवसात आल्यानंतर कामगारांशी चर्चा घडवून देऊ असेही भैया देशमुख यांनी व भीमा चे संचालक बिबीशन वाघ यांनी आश्वासन दिले कारखाना कामगार युनियनचे सचिव हनुमंत चव्हाण यांनी प्रभाकर भैय्या देशमुख यांच्याशी फोनवरून संपर्क साधून व्यथा मांडल्या आणि कारखान्यावर येण्याची विनंती केली तातडीने भैया देशमुख भीमा कारखान्यावर ती पोहोचले कामगारांना समजावून सांगून त्यांना कारखाना चालला पाहिजे गाळप हंगाम जवळ आला आहे आता कॉम्पिटिशन आहे त्यामुळे कुणाचेही नुकसान झाले नाही पाहिजे कामगारही माझा जिवंत राहिला पाहिजे अशी भूमिका समजावून सांगून कामगारांना काम करण्यासाठी विनंती केली व कामगारांनी लगेच कामाला सुरुवात केली पंधरा दिवस कामगारांना अनेकांनी विनंती केली होती परंतु कामगार त्यांच्या भूमिकेशी ठाम होते अशी चर्चा कारखाना कार्यस्थळावर सुरू होती परंतु मार्ग काढण्यामध्ये प्रभाकर देशमुख यात यशस्वी झाले यावेळी सुनील चव्हाण कार्यालयीन अधिक्षक भाऊसाहेब जगताप युनियन कामगार संघटनेचे अध्यक्ष अण्णासाहेब पाटील सचिव हनुमंत चव्हाण उपाध्यक्ष अशोक गायकवाड सदस्य विष्णू वाघमोडे जनहित चे चंद्रकांत निकम जनहित युवक चे जिल्हा उपाध्यक्ष महेश बिस्किटे जनहित चे पंढरपूर तालुका अध्यक्ष प्रवीण गायकवाड ,प्रशांत पाटील बैठकीला बरेचसे कामगार उपस्थित होते

Pages